नागपूर - 8 मे म्हणजे राष्ट्रीय मातृत्व दिवस. आईने केलेल्या संस्काराची जाणीव करून देणारा दिवस म्हणजेच मातृत्व दिवस. आई प्रति प्रेम आणि सन्मान व्यक्त करताना राष्ट्रीय मातृत्व दिवस आपल्या देशात उत्साहात साजरा केला जातो. आई म्हणजे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय, माय माऊलीसाठी तिचे बाळ म्हणजे जीव की प्राण, बाळ कधी संकटात असेल तर ती माऊली स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता परिस्थिती सोबत एकटी झुंज देते, अशीचं एक रणरागिणी माता नागपुरात सुद्धा आहे. मीनाक्षी आकुलवार असे या धाडसी आईचे नाव आहे. त्या व्यवसायाने पॅथॉलॉजीस्ट आहेत. मीनाक्षी आकुलवार यांच्या 16 महिन्यांच्या बाळाला दुर्मिळ आजाराने ग्रासले आहे. त्याच्यावर उपचार करण्यासाठी 16 कोटी रुपयांची गरज आहे. त्याकरिता ही आई दिवसभर एक करून मुलासाठी एक-एक रुपयांची मदत गोळा करते आहे. ही या आईचीचं पुण्याई असेल की त्यांनी आत्तापर्यत 4 कोटी 17 लाख रुपयांचा निधी उभा केला आहे. परिस्थिती कशीही असो मी माझ्या मुलासाठी 16 कोटी रुपयांचा निधी गोळा करेल आणि मुलाला स्वतःच्या पायावर उभे करेलचं हा निर्धार या आईने केला आहे.
आपलं मूल सुदृढ आणि निरोगी व्हावे ही जगातील प्रत्येक आईची इच्छा असते. मूल मोठं झालं की ते उच्चशिक्षित व्हावं, मोठ्या पगाराची नोकरी मिळवून मोठा साहेब व्हावा आणि जगात नावं कमवावे या करिता तीच आई देवापुढे प्रार्थना करते,मात्र तोच मुलगा आई कुठे काय करते म्हणत तिच्या उपकाराची साधी जाण देखील ठेवत नाही,मात्र ती आई कुठल्याही परिस्थितीत कधीचं आपल्या मुलाला स्वतःपासून दूर होऊ देत नाही. मीनाक्षी आकुलवार यांच्या ज्यावेळी कळलं की त्यांच्या मुलाला स्पाईनल मस्कुलर ऍट्रॉफी (एसएमए) नामक दुर्मिळ आजाराने ग्रासलं आहे, आणि उपचाराचा खर्च आवाक्यात बाहेर आहे,त्या दिवसा पासून ती आई डिजिटल माध्यमांच्या माध्यमातून त्यांनी एक मोहीम सुरू केली आहे. त्यांच्या या अभियानात अभिनेता सोनू सूद देखील सहभागी झाला आहे. कुठल्याही परिस्थितीत मुलाला 16 कोटी रुपयांचे इंजेक्शन मिळवून देण्यासाठी ही माऊली झटत आहे.
विहानसाठी मदतीचे आवाहन - विहानला दुर्मिळ आजराने ग्रासलं आहे आणि त्याच्या उपचाराचा खर्च अपेक्षेच्या कितीतरी बाहेर असल्याने आता सर्व काही संपलं अशीच भावना त्यांच्या मनात घर करत असताना काही मीनाक्षी आणि त्याच्या मित्रपरिवाराने विहानवर उपचार करण्यासाठी एक मोहीम हाती घेतली. त्याअंतर्गत अभिनेता सोनू सूद,अभिषेक बच्चन या सारख्या कलावंतांना मदतीचे साकडे घालण्यात आले. चिमुकल्या विहानच्या मदतीसाठी अनेकांनी पुढाकार घेतला, त्यात सोनू सूदचा सहभाग सर्वात मोठा आहे. नागरिकांनी इम्पॅक्ट गुरू प्लॅटफ्रॉम आणि गो फंड प्लॅटफ्रॉम जाऊन सढळ हाताने मदत करावी असे आवाहन केले आहे
हेही वाचा - Mothers Day Special : आईच्या पाठिंब्याने जगातील पर्वतांना सर करणारा गिर्यारोहक
विहानसाठी नागपूरकरांनी एकत्र यावे - सोनू सूद - विहानवर उपचार करण्यासाठी तब्बल 16 कोटी रुपयांची गरज असल्याने क्राउड फंडिंगच्या माध्यमातून ही रक्कम जमा करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये अभिनेता सोनू सूद सर्वात पुढे आहे. सोनू सूद याने विहानच्या कुटुंबाला कोणतीही कल्पना न देता थेट नागपूर गाठले आणि विहानची भेट घेतली. एवढ्यावर तो थांबला नाही. त्याने एक पत्रकार परिषद घेऊन विहानला मदत करण्याचे आवाहन केले आहे.
१२ कोटींची गरज - विहानला 16 कोटी रुपयांचे इंजेक्शन मिळावे यासाठी क्राउड फंडिंगच्या माध्यमातून 4 कोटींची रक्कम जमा करण्यात आली आहे,उर्वरित 12 कोटी रुपये पुढील महिन्याभरात जमा करण्याचे मोठे आवाहन आकुलवार दाम्पत्यासमोर आहे, मार्ग कठीण जरी असला तरी अशक्य नाही,त्यामुळे मीनाक्षी आणि डॉ.विक्रांत आकुलवार यांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे.