ETV Bharat / state

नागपुरात एकाच दिवसात २०५२ रुग्णांची नोंद तर सर्वाधिक ६० रुग्णांचा मृत्यू - नागपूर कोरोना स्थिती

नागपुरात सातत्याने कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत. बुधवारी एकाच दिवसात तब्बल २०५२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. रुग्णवाढीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आलेले नाही.

नागपूर
नागपूर
author img

By

Published : Sep 17, 2020, 5:42 AM IST

नागपूर - राज्याची उपराजधानी नागपुरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला कोरोनाचा धुमाकूळ आजही सुरूच आहे. बुधवारी पुन्हा एकाच दिवसात तब्बल २०५२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. नागपुरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५७,४८२ झाली आहे. नागपुरात काही केल्या कोरोना रुग्ण वाढीवर प्रशासनाला नियंत्रण मिळवता आलेले नाही. वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर शनिवारी आणि रविवारी 'जनता कर्फ्यु'चे आयोजन करण्यात आले आहे. रुग्ण वाढीचा वेग लक्षात घेता या महिन्यात तब्बल ५० हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनाबाधित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या २०५२ रुग्णांपैकी ४१७ रुग्ण नागपूर ग्रामीण भागातील आहेत तर १६२६ रुग्ण हे शहराच्या विविध परिसरातील आहेत. तर आज १५९४ कोरोना रुग्ण उपचारानंतर अगदी ठणठणीत बरे होऊन घरी देखील परतले आहेत. नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४३,९२७ इतकी झाली आहे. याशिवाय आज सर्वाधिक ६० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे नागपुरात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा एकूण आकडा १८१५ इतका झाला आहे. सध्या नागपुरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ७६.४२ टक्के इतके आहे.

हेही वाचा - राज्यात कोरोनाचा उद्रेक, आज २३ हजार ३६५ नव्या रुग्णांची नोंद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.