नागपूर - जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या आधीक वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. बाधित रुग्णांची संख्या दोन लाखांच्या घरात पोहोचली असून मागील पाच महिन्यात एक लाखाचा टप्पा गाठला आहे. गेल्या वर्षी बाधितांची संख्या 1 लाख होण्यासाठी 8 महिन्याच्या कालावधी लागला होता. यात सातत्याने सरासरी आता 3 हजाराच्या घरात आहे. मंगळवारी आलेल्या हवालात 3 हजार 095 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मागील तीन दिवसांच्या तुलनेत यामध्ये थोडीशी घट दिसून येत आहे.
नागपुरात 3095 कोरोना बाधितांची भर, नागपूर शहरात सोमवारी 14 हजार 956 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये मंगळवारी प्राप्त अहवालानुसार नागपूर शहरातील 2272 जण कोरोना पॉझिटिव्ह मिळून आले. तेच ग्रामीण क्षेत्रात 819 नवीन बाधितांची भर पडली. यात चार जण बाहेर जिल्ह्यातील असून एकूण 3095 बाधित मिळून आले. यात शहरात 19, ग्रामीण मध्ये 10, बाहेर जिल्ह्यातील चौघांचा मृत्यू झाला आहे. तेच 4 हजार 697 बाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. यात शहरातील अॅक्टिव्ह रुग्ण हे 31 हजार 993 इतके आहेत. आतापर्यंत नागपूर जिल्ह्यात 1 लाख 99 हजार 771 जण बाधित झाले आहे.
कोरोनाने प्रकोपाच्या काळातील अनेक रेकॉर्ड मोडले...मागील वर्षी नागपुरात सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली. पण यंदा एका दिवसात रुग्ण मिळण्याची संख्या असो की संशयित रुग्णाची कोरोना चाचणी असो हे दोन्ही विक्रम मोडीत काढले आहेत. या सर्व परिस्थितीत मृत्यूचे प्रमाण वाढले. जो एक लाखाचा टप्पा पूर्ण होण्यासाठी गेल्या वर्षातील प्रकोपाच्या काळात 8 महिला लागले होते. त्यात नव्या लाटेत हा टप्पा पाच महिन्याच्या कालावधित पूर्ण झाला. यामुळे या मागील महिन्याभरात दररोज नवीन रोकॉर्ड झाले आणि तोडले.
पूर्व विदर्भात प्रमाण जास्त-
पूर्व विदर्भात मंगळवारी 3 हजार 749 कोरोना बाधितांची नोंद झाली. यात मागील चार ते पाच दिवसांच्या परिस्थितीनंतर हा आकडा चार हजाराच्या आत आल्याचे दिसून आले. तेच एकूण 39 जणांचा मृत्यूची नोंद झाली असून त्यात 33 नागपूर जिल्ह्यात 6 जण वर्धा जिल्ह्यात नोंदवले गेलेले आहे. नागपुरात 3095, भंडारात 198, चंद्रपूर 112, गोंदिया 46, वर्धा 234 तर गडचिरोली 64 जण कोरोनातून बाधित मिळुन आले असून 2585 जण कोरोनातून मुक्त झाले.