ETV Bharat / state

Togadia's challenge to RSS : मोहन भागवतजी पाक वर हल्ला करा मी सोबत असेल - तोगडिया - उद्धव ठाकरे

मोहन भागवतजी पाकिस्तानावर हल्ला करा (Mohan Bhagwatji Attack Pakistan) मी तुमच्या सोबत असेन ( I will be with you). तुम्ही स्वत: टॅंक घेऊन तीथे घुसा मी पण स्वत: टॅंकची साफ सफाई करायला येईल असे आव्हान अंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे प्रमुख प्रविण तोगडिया (Praveen Togadia ) यांनी राष्ट्रिय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Sarsanghchalak Mohan Bhagwat) यांना दिले आहे.

तोगडिया - भागवत
author img

By

Published : Apr 19, 2022, 9:50 AM IST

Updated : Apr 19, 2022, 1:38 PM IST

नागपूर: अंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे प्रमुख प्रविण तोगडिया (Praveen Togadia) यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलेकी, मोहन भागवत (Mohan Bhagwatji) म्हणतात 15 वर्षात अखंड भारत निर्माण करायचा आहे. आता त्यांची सत्ता आहे. त्यामुळे त्यांनी बोलण्यापेक्षा करून दाखवावे. यासाठी पहिले पाऊल म्हणून त्यांनी कश्मीर घाटीत हिंदूला वसवावे आणि एक रात्र तिथे काढावी मी त्यांच्या सोबत असेल, संघाने पाक व्याप्त काश्मिर मधे संघाची शाखा लावावी मी त्या शाखेत असेल, तिसरे पाकिस्तानवर टॅंकवर बसून हल्ला करावा मी त्यांचा टॅंक ज्या रस्त्याने जाणार असेल तो रस्ता साफ करण्याचे काम करेल असेही प्रवीण तोगडिया यांनी म्हणले आहे .

तोगडिया - भागवत

48 तासांत भोंगे हटवण्याचे आदेश द्यावे: सध्या भोंग्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. यावर बोलताना तोगडिया म्हणाले भोंगे आजचे नाहीत तर महाराष्ट्रात भाजपचे सरकार असताना सुद्धा भोंगे होते. पण सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आधार घेत केंद्र सरकारने सर्व जिल्हाधिकार्‍यांना, एसीपींना 48 तासांच्या आत भोंगे हटवण्याचे आदेश द्यावे. तो प्रश्न निकाली निघेल. भाजपचे सरकार असताना भोंगे हटवण्याचा विषय केला नाही. मध्य प्रदेश गुजरात मधे भाजपचे सरकार आहे आधी तेथे भोंगे हटवण्याचे आदेश द्यावे, आणि महाराष्ट्रात आंदोलन सुरू ठेवावे. पण सत्ता असलेल्या ठिकाणी हटवायचे नाही आणि महाराष्ट्रात आंदोलन करायचे हे चुकीचे आहे अशी टीका त्यांनी भाजवर केली.

जिहादींना गोळ्या घालण्याची गरज: गुजरात, मध्य प्रदेशात दंगे होतात, हे गुप्तचर विभागाला माहीत होत नाही हे त्यांचे अपयश आहे. पण जिहादींची हिम्मत वाढली आहे त्यांना बिर्याणी नाही तर गोळ्या घालण्याची गरज आहे. निवडणुका असल्याने रोजगारीचा प्रश्न, महागाई वाढत असल्याने तर हे दंगे होत नाही ना असा संशय व्यक्त होत आहे. हा माझ्यासाठी चिंतेचा विषय आहे. दंगलीमधे हिंदू आणि मुस्लिम दोघेही मरतील आणि मतदान दुसऱ्यांना होईल त्यामुळे हिंदूंनी जागृत राहण्याची गरज आहे. दंगली घडवुन राजकीय षड्यंत्र तर आखले जात नाही याकडे जनतेने लक्ष द्यावे. आणि सुरक्षित रहावे असेही तोगडिया म्हणाले.

तर 10 करोड बेरोजगारांना घेऊन रस्त्यावर: केंद्रात आणि राज्यात एक कोटी सरकारी जागा रिक्त आहेत, यात सर्व राज्यसरकार मिळून एक कोटी सरकारी जागेवर 10 करोड बेरोजगारांपेकी एक करोड तरुणांना रोजगार मिळेल. हे सरकार करणार नसेल तर प्रवीण तोगडिया 10 करोड बेरोजगारांना रस्त्यावर घेऊन निघणार असा इशाराही तोगडिया यांनी दिला आहे . इ श्रम कार्ड धारकांच्या खात्यात केंद्रसरकारने एक प्रत्येक वर्षी सहा हजार जमा करावे जेणेकरून गरिबी दुरु होण्यास मदत होईल. आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून हिंदू बेरोजगार योजना राबवत 10 हजार लोकांना पहिल्या चरणात रोजगार देऊ असे अश्वासनही तोगडिया यांनी दिले.

उद्धव ठाकरे हिंदूंचे रक्षण करतील: महाराष्ट्रात 3 मे नंतर कायदा सुव्यस्था बिघडणार असेल तर पोलिसांना माहीत, पण गोळी हिंदू नी खावी हे व्ह्यायाला नको, माझा विश्वास आहे उद्धव ठाकरे
(Uddhav Thackeray) हे बाळासाहेब ठाकरे प्रमाणे हिंदूंचे रक्षण करतील आणि जिहादीना तोंड वर काढू देणार नाहीत.

आरोप करण्या आधी स्वतःकडे बघावे: भाजपने मेहबुबा मुक्ती सोबत सत्ता बनवली, त्यावेळी कोणी अशी चर्चा केली नाही की भाजपने हिंदुत्व सोडले, त्यामुळे जे शिवसेनेवर हिंदुत्व सोडल्याचा आरोप करतात त्यांनी भाजपला विचारावे, ज्या व्ही. पी सिंग यांनी हिंदूंवर गोळ्या झाडल्या त्याच्यासोबत भाजप गेली होती. त्यामुळे आरोप करण्याची स्वतःकडे बघावे असा सल्ला तोगडिया यांनी दिला आहे. त्यांच्याकडे अशी कोणची मशीन आहे हे त्यांनी सांगावे की त्यांच्या सोबत गेले की सगळे हिंदुत्ववादी होतात असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा : Delhi Jahangirpuri Violence : जहांगीरपुरी हिंसाचारात भाजप अन् त्यांच्या काही संघटनांचा हात; शरद पवार यांचा गंभीर आरोप

Last Updated : Apr 19, 2022, 1:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.