नागपूर - भारतातील हिंदी चित्रपट सृष्टीला ज्यांनी अनेक गाणी दिली असे मोहम्मद रफी यांचा आज जन्मदिवस (Mohammed Rafi B’day) आहे. त्यांच्या या जन्मदिनी जाणून घेऊया त्यांच्याच एका चाहत्याकडून त्यांच्या काही खास आठवणी. आणि त्यांना भारतरत्न मिळावा म्हणून त्याच्यासाठी चार दिवस आणि पाच रात्र असे तब्बल 105 तास गायन केलेल्या अवलियाबद्दल जाणून घेऊया ईटीव्ही भारताच्या या विशेष वृत्तातून..
नागपुरात स्थायिक झालेले सुनील वाघमारे मूळचे वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील आहे. घरात हलाखीची परिस्थिती असल्याने भजन गाता गाता त्यांनी प्रसिद्ध गायक मोहम्मद रफिच्याआवाजाचा सूर धरला. तो सूर त्यांनी मागील 38 वर्षात कधी सोडला नाही. त्यांच्या गाण्यांचा रियाज करून त्यांनी गायन क्षेत्रात आपली प्रगती साधली. आयुष्यभर त्याना गुरुस्थानी मानून त्यांनी गायलेले गाणे गाण्याच्या सफर आजही सुरू आहे. त्याचे गाणे हे आजही तितकेच ताजे आणि सर्व प्रसंगावर बोलके असल्याचे सुनील वाघमारे सांगतात...
केवळ श्रवण करून गाण्यांचा केला रियाज
लहानपणी वयाच्या 12 ते 15 वर्षाचे असतांना रेडिओवर त्यांच्या आवाजाचा जादू मनात भिनली. भजन म्हणतात म्हणता मोहम्मद रफीने गायलेले गाणे त्यांचाच आवाज आपल्या गळ्याला साजेसे आहे हे त्यांच्या चाहत्यांनी लक्षात आणून दिले. त्यांनी त्यानंतर मोहम्मद रफीचे गाणे ऐकून त्यांचा सराव केला. पुढे ऑर्केस्ट्रा आणि गायकी पेशात त्यांनी मोहम्मद रफीची हजारो गाणे मुखोद्गत केली. त्यांनी दिवस रात्र कुठलेही संगीत आणि गायनाचे खास प्रशिक्षण न घेता कठोर परिश्रमाचा जोरावर हा प्रवास असाच सुरू ठेवला. त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी ते जिवंत असतांना लाभली नाही. याचा त्यांना आयुष्यभर खंत असल्याचे सल त्यांच्या मनात आहे. दुसरी एक आठवण त्याच्या डोळ्यात सामावलेली आहे.
तो क्षण आजही डोळ्यासमोर तसाच आहे...
मोहमद रफीच्या मृत्यूची बातमी त्यांना कळताच तेव्हा मात्र स्वतःला रोखू शकले नाही. 50 रूपये सावकाराकडून कर्ज काढून त्यांनी मुंबई गाठली. हजारो लोकांच्या गर्दीत शेवटचा क्षणी त्यांचा चेहरा डोळ्यात प्रत्यक्ष पाहून आयुष्य त्यांचे गाणे गाण्यासाठी वाहले. त्यांना भारत रत्न मिळावे यासाठी अखंडपणे त्याचे गाणे गाण्याचा विक्रम करण्याचे ठरले. प्रत्येक वेळी त्यांचे गाणे गाण्याचा विक्रम दुसराच कोणी करून जात असल्याने अडचणी आल्यात. पण खचून न जाता तीनदा न करू शकलेला विक्रम अखेर पूर्ण केला. यासाठी त्यांनी दिवस रात्र गाणे गाण्याचा रियाज करत तासोनतास गाणे गायले. अखेर त्यांनी 105 तास एक सारखे रफीचे गाणे गायले. यासाठी 2012 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सुनील वाघमारे यांच्या नावावर आहे. पण इथेच हा प्रवास थांबला नाही. आजही ते गाणे गात असतात.
त्यांच्या काळात त्यांनी ते गायले नसावे
आयुष्यभर गुरुस्थानी मानून सुनील वाघमारे हे रफीचे गाणे आणि त्यामागचे एकसे एक किस्से सांगतात. एकदा का रफींवर बोलायला सुरुवात केली. त्यांना भानच राहत असून ते तासोनतास बोलत जातात. त्यानी गायलेले हिंदी तसेच इतरही भाषांमध्ये गाणे याबद्दल कधी एकूण वाचून माहिती घेऊन एक मोठा आठवणींचा संग्रह जपला आहे. मोहहमद रफीच्या वाढदिवसाच्या दिनी ईटीव्हीच्या माध्यमातून इतर चाहत्यासाठी हा स्पेशल रिपोर्ट.