ETV Bharat / state

सतरंजीपुरा सैन्याच्या हवाली करुन प्रत्येकाची आरोग्य चाचणी करावी - आमदार कृष्णा खोपडे

author img

By

Published : Apr 22, 2020, 8:46 AM IST

Updated : Apr 22, 2020, 10:49 AM IST

खोपडे यांनी महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेटसुद्धा घेतली. काही दिवसांपूर्वी आमदार कृष्णा खोपडे यांनी सतरंजीपुरा परिसरात सैन्य तैनात करण्यात यावे, अशी मागणी केली होती. हीच मागणी त्यांनी पुन्हा केली आहे. हा परिसर नागपुरातील कोरोनाचे सर्वात मोठे हॉटस्पॉट ठरला आहे.

आमदार कृष्णा खोपडे

नागपूर - सतरंजीपुरा भागात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्याने गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. या भागातील सर्वच नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात यावी, अशी मागणी आमदार कृष्णा खोपडे यांनी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रदेखील पाठवलं आहे.

याशिवाय खोपडे यांनी महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेटसुद्धा घेतली. काही दिवसांपूर्वी आमदार कृष्णा खोपडे यांनी सतरंजीपुरा परिसरात सैन्य तैनात करण्यात यावे, अशी मागणी केली होती. हीच मागणी त्यांनी पुन्हा केली आहे. हा परिसर नागपुरातील कोरोनाचे सर्वात मोठे हॉटस्पॉट ठरला आहे.

आमदार कृष्णा खोपडे

प्रशासनाने संपूर्ण सतरंजीपुरा आणि आजूबाजूचा परिसर सील केला आहे. तरी या भागात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील नागरिकांना कोरोनाची लागण होत आहे, त्यामुळे, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. याच कारणामुळे या भागात सैन्य तैनात करण्याची गरज आहे. त्यामुळे, या भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

Last Updated : Apr 22, 2020, 10:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.