नागपूर - हिवाळी अधिवेशनासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. अधिवेशनाचे ४ दिवस संपले आहेत. मात्र, अद्यापही विदर्भाची झोळी रिकामीच असल्याची खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केली.
विदर्भाचे प्रश्न सोडवण्यासाठी नागपूर करारानुसार उपराजधानी नागपूरमध्ये वर्षातील एक अधिवेशन घेण्याची परंपरा आहे. गेल्या ५८ वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. मात्र, त्याचा मूळ उद्देश साध्य होत नसल्याचे आमदार भुयार म्हणाले. अधिवेशनाचे शेवटचे २ दिवस शिल्लक आहेत. गेल्या ४ दिवसात झालेल्या अधिवेशनाच्या कामकाजात विदर्भाच्या पदरी निराशाच पडली आहे. मात्र, आता उरलेल्या २ दिवसात तरी सत्ताधारी विदर्भाची उपेक्षा करणार नाही, अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.