ETV Bharat / state

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा भारत बंदला संमिश्र प्रतिसाद; धान्य बाजार बंदच

केंद्राने पारित केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात बारत बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र, नागपुरात या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद पहायला मिळाल आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती
author img

By

Published : Dec 8, 2020, 4:56 PM IST

नागपूर - देशभरात पुकारण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. नागपुरात मात्र यास संमिश्र प्रतिसाद पहायला मिळाला. नागपुरातील कृषी उत्पन्न बाजार समिती, कळमना येथे धान्य बाजार पेठ पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती
बंद दुकाने

याच अनुषंगाने विविध शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीने देखील या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. नागपुरातही कृषी उत्पन्न बाजार समिती, कळमनाच्या वतीने आंदोलनाला समर्थन देत बाजारपेठ बंद ठेवले आहे. विशेषतः या बाजारपेठातील धान्य बाजार पूर्णतः बंद ठेवण्यात आले आहे. तर इतर बाजारपेठा या सकाळी काही वेळ सुरू होत्या.

धान्य बाजारपेठ पूर्णतः बंद

मुख्य बाजारपेठ असलेल्या धान्य बाजारपेठ सकाळपासूनच बंद असल्याचे दिसून येत आहे. शिवाय शेतकऱ्यांनीही बाजार समिती बंदच ठेवण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे सकाळपासून कळमना बाजारपेठेत शुकशुकाट पहायला मिळत आहे.

हेही वाचा - 'वीज तोडायला येणाऱ्यांचे पाय तोडू'! विदर्भवादी नेते राम नेवले यांचा इशारा

हेही वाचा - इअरफोन्स लावून रुळावरून चालताना रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.