ETV Bharat / state

'अजित पवारांवरील सिंचन घोटाळ्याचे आरोप सिद्ध झालेले नाहीत' - अजित पवार

अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे केवळ आरोप झाले आहे, ते सिद्ध झाले नसल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा.गो. वैद्य म्हणाले.

मा.गो. वैद्य
author img

By

Published : Nov 25, 2019, 1:17 PM IST

Updated : Nov 25, 2019, 1:39 PM IST

नागपूर - राज्याच्या राजकारणातील आता सगळे जुने समीकरण विसरून जावे लागेल, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा.गो. वैद्य यांनी व्यक्त केले. राज्याच्या राजकीय परिस्थितीवर ते बोलत होते. अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे केवळ आरोप झाले आहे, ते सिद्ध झाले नसल्याचे देखील ते म्हणाले आहे.

बोलताना मा. गो. वैद्य

2014 मध्ये तरी भाजप सेनेची युती नव्हती. तरीही 5 वर्षे सरकार चालले आणि तेव्हा सुद्धा राष्ट्रवादीने भाजपला पाठिंब्याचे संकेत दिलेच होते. त्यामुळे राजकारणात कधी काय होईल? हे सांगता येत नाही. म्हणूनच गडकरी म्हणाले होते की, क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकते. राष्ट्रवादी तथाकथीत हिंदुत्ववादी सेनेसोबत जाऊ शकते, तर भाजप सोबत का नाही? अडचण कोणालाच नाही. आता ते किती लोक येतात हे विश्वासदर्शक ठरावाच्यावेळीच कळेल, असे वैद्य म्हणाले. अजित पवार यांच्यावर केवळ आरोपच लावण्यात आले आहेत. त्यांच्यावर खटला सुरू आहे का?, शिक्षा झाली आहे का? असेही ते म्हणाले. तसेच जोपर्यंत खटल्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत काही नाही, असे म्हणत वैद्य यांनी अजित पवारांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा - क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं, माझे हे शब्द खरे ठरले-नितीन गडकरी

Intro:राज्याच्या राजकारणातील आता सगळे जुने समीकरण विसरून जावे लागेल असे मत व्यक्त केले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारवंत मा. गो वैद्य यांनी,ते राज्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलत आहे...अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे केवळ आरोप झाले आहे,ते सिद्ध झाले नसल्याचे देखील ते म्हणाले आहे Body:2014 मध्ये तरी भाजप सेनेची कुठे युती होती,तरीही पाच वर्षे सरकार चालले,आणि तेंव्हा सुद्धा राष्ट्रवादीने भाजपला पाठिंब्याचे संकेत दिलेच होते,त्यामुळे राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही,म्हणूनच गडकरी म्हणले क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकते...राष्ट्रवादी तथाकथीत हिंदुत्ववादी शिव सेने सोबत जाऊ शकते तर भाजप सोबत का नाही,अडचण कोणालाच नाही...आता ते किती लोक येतात हे विश्वास मताच्या दिवशी कळेल, मतदारांनाही हे चालतं....शिव सेना महा आघाडीत जाऊ शकते, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ पाहतात तेंव्हा मतदार काय करू शकतात,पाच वर्षे किंवा निवडणुकीची वाट पाहू शकते,
आता विश्वास मत किंवा त्यावरचा निकाल महत्वाचा आहे...अजित पवार यांच्यावर केवळ आरोपच लागले आहेत,खटला सुरू आहे का? शिक्षा झाली आहे का? जोपर्यंत खटल्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत काही नाही

बाईट- मा. गो वैद्य- माजी प्रवक्ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघConclusion:
Last Updated : Nov 25, 2019, 1:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.