ETV Bharat / state

Nagpur City Projects Approved : नागपूरच्या विकासाला चालना देणार मेट्रो टप्पा - २, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यापूर्वी केंद्र सरकारकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नागपूर मेट्रो टप्पा-२ (Metro Phase II Project) आणि नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला (Nag River Rejuvenation Project) मंजुरी (approved In Nagpur) दिली आहे. Nagpur City Projects Approved

Nagpur City Projects Approved
केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
author img

By

Published : Dec 9, 2022, 5:23 PM IST

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यापूर्वी केंद्र सरकारकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नागपूर मेट्रो टप्पा-२ प्रकल्पाला (Metro Phase II Project) मंजुरी मिळाली आहे. केंद्र सरकारने नागपूरच्या विकासाला चालना देणारे मेट्रो टप्पा-२ व नागनदी पुनरुज्जीवन (Nag River Rejuvenation Project) या एकूण ८ हजार ८०८ कोटी रुपयांच्या दोन प्रकल्पांना केंद्र सरकारने गुरुवारी मंजुरी (approved In Nagpur) दिली. मेट्रो टप्पा - दोन ४३.८ किलोमीटरचा असून ६,७०८ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. या टप्प्यात नागपूरलगत बुटीबोरी, कन्हान आणि हिंगण्यापर्यंत मेट्रो धावणार आहे. हा प्रकल्प पाच वर्षांत म्हणजे, २०२८ पर्यंत पूर्ण होईल, दुसऱ्या टप्प्यात पहिल्या टप्प्यातील सर्व चारही लाइनला पुढे वाढविली जाणार आहेत. Nagpur City Projects Approved

असा असेल विस्तारीत मार्ग : मेट्रो टप्पा-2 खापरीला बुटीबोरी एमआयडीसी पर्यत जोडणार आहे. हामार्ग १८.६ किमीटरचा असेल तर ऑटोमोटिव्ह चौकाला कन्हानसोबत जोडले जाणार आहेत. हा विस्तारित मार्ग १३ किलोमीटरचा असेल, प्रजापतीनगरला कापसी सोबर जोडले जाईल. हा मार्ग ५.५ किलोमीटर असेल तर, लोकमान्यनगरला हिंगणा सोबत जोडण्यात येणार आहे. हा विस्तारीत मार्ग ६.७ किलोमीटर अंतराचा असेल.त्यामुळे बुटीबोरी, कामठी, कन्हान येथून रोज नागपूरला कामा निमित्ताने जाणे-येणेकरणार्यांना फायदा होणार आहे.

82 किलोमीटरची नागपूर मेट्रो : मेट्रोचा दुसरा टप्पा नागपूरच्या उपग्रह शहरांना जोडेल आणि या भागात राहणाऱ्या 10 लाखांहून अधिक लोकसंख्येला मोठा फायदा होईल, असा अंदाज आहे. जेव्हा संपूर्ण काम पूर्णत्वास जाईल, तेव्हा नागपूर मेट्रो प्रकल्पाची एकूण लांबी 82 किमी असेल.

50,000 लोकांना रोजगार : बुटीबोरी ही नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असून; या वसाहतीत हजारो नागपुरी काम करतात. बुटीबोरीमध्ये सुमारे 750 युनिट्स आहेत, ज्यात सुमारे 50,000 लोकांना रोजगार आहे. मेट्रो त्यांच्या कारखान्यांना जलद प्रवासाची सुविधा देईल. हिंगणा हे नागपूरला लागून असलेले झपाट्याने विकसित होणारे शहर आहे. कापसी येथे औद्योगिक वसाहत असून, ते वाहतूक केंद्र आहे. Nagpur City Projects Approved

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.