नागपूर - विदर्भातील अनेक भागात मागील १२ दिवसांपासून संततधार सुरू आहे. यामुळे जुन आणि जुलै महिन्यात पावसाची तुट भरून निघाली आहे. १ जून ते ७ ऑगस्टपर्यंत विदर्भात ५३३ मिमी पाऊस पडला आहे. येत्या २ दिवसांत विदर्भात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. पावसाळ्यातील आतापर्यंतचा हा सर्वात प्रभाव करणार कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे येत्या ४८ तासांत विदर्भातील काही भागात मुसळाधार पाऊस पडेल, असा अंदाज नागपूर हवामान विभागाने वर्तवला आहे.