नागपूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांचे कष्ट बघितले, त्यांच्यावर होणारे अन्याय, अत्याचार बघितले आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी जे परिश्रम केले ते लोकांनी बघितले. त्यामुळे त्यांच्या सोबत अनेक लोकांनी धर्म बदलला. जेव्हा लोक मोठ्या प्रमाणात माझ्या सोबत येतील तेव्हा मी देखील धर्म बदलेन आणि बौद्ध धर्म स्वीकारेल, असे वक्तव्य बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा अध्यक्षा मायावती यांनी केले.
बाबासाहेबांनी जनतेला न्याय मिळवून देऊन मृत्यूच्या आधी हिंदू धर्मचा त्याग केला होता, असे मत बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी नागपूर येथील प्रचार सभेत सोमवारी व्यक्त केले. विशेष म्हणजे आज १४ ऑक्टोबर असल्याने त्यांच्या या वक्तव्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले.
हेही वाचा -'देशातील गरिबी वाढवतीय मोदीनॉमिक्स', राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमीच्या दिवशी भारत हा हिंदु राष्ट्र आहे असे म्हटले होते. यावर टीका करताना मायावती म्हणाल्या की, बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान त्यांनी वाचावे. भारत हे हिंदू राष्ट्र नाही तर धर्मनिरपेक्ष देश आहे असेही मायावती म्हणाल्या.
हेही वाचा - तपास अधिकारी बदला; कॉ. पानसरेंच्या कुटुंबीयांची न्यायालयात मागणी