नागपूर - पोलिसांच्या मारहाणीत मनोज ठक्कर नामक दिव्यांग तरुणाचा मृत्यू झाला होता, या प्रकरणातील तीन कर्मचाऱ्यांना नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी निलंबित केले आहे. यात उपनिरीक्षक मुकेश ढोबळे, पोलीस शिपाई नामदेव चरडे आणि आकाश शहाने यांचा समावेश आहे. दिव्यांग मनोज ठवकर मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी सुरू असून सर्व निलंबित कर्मचाऱ्यांची बदली पोलीस मुख्यालय करण्यात आली होती.
ही घटना नागपूर शहरातील पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घडली. नाकेबंदी दरम्यान मनोजची दुचाकी पोलिसांच्या वाहनावर धडकली होती. ज्यामुळे संतप्त झालेल्या पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली. ज्यामुळे दिव्यांग मनोजचा मृत्यू झाला होता. मनोज काही कामानिमित्ताने बाजाराला गेले होते. तिथून ते परत घरी येत असताना पारडी परिसरात पोलिसांची नाकाबंदी कारवाई सुरू होती. ज्यामध्ये ड्रिंक आणि ड्राइव्ह सह मास्क संदर्भातील कारवाई केली जात होती. पोलिसांनी मनोज यांना थांबण्याचा इशारा केला. मात्र, मनोज आपली दुचाकी घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यामुळे त्यांच्या दुचाकीची धडक पोलीसांच्या गाडीला लागली. या घटनेमुळे संतापलेल्या पोलिसांनी मनोज ठक्कर यांना नाकेबंदीच्या ठिकाणीच मारहाण केली. यात मनोजचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर पारडी परिसरातील नागरिक प्रचंड संतप्त झाले होते.
हेही वाचा - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई मॉडेल स्वीकारणार का?'