ETV Bharat / state

नागपूर : दिव्यांगं मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला 20 वर्षाचा सश्रम कारावास - नागपूर गुन्हे वार्ता

दिव्यांगं मुलीवर आत्याचार करणाऱ्या आरोपीला 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश केजी राठी यांनी ही शिक्षा सुनावली आहे.

nagpur latest news
nagpur latest news
author img

By

Published : Sep 1, 2021, 2:01 AM IST

नागपूर - उपराजधानी नागपुरात अल्पवयीन दिव्यांगं मुलीवर आत्याचार करणाऱ्या आरोपीला 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश केजी राठी यांनी ही शिक्षा सुनावली आहे. महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात आली. यानंतर राज्यातीलच नव्हे, तर देशातील पहिली कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. आकाश बंटक येदानी, असे आरोपीचे नाव आहे.

प्रतिक्रिया

काय आहे प्रकरण -

नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 4 नोव्हेंबर 2018मध्ये हे प्रकरण सामोरे आले. यात एकाच गावात राहणाऱ्या आरोपीने अल्पवयीन दिव्यांगं मुलीवर तिच्या अज्ञानातेचा गैरफायदा घेतला. यात आकाश येदानी हा विवाहित असून त्याला दोन अपत्य होते. त्याने पीडित दिव्यांगं मुलीवर अत्याचार केला. यात त्यामुळे तिला गर्भधारणा झाली. ही बाब जेव्हा आईच्या लक्षात आली, तेव्हा काटोल पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये नवीन कलमाच्या सुधारणे नुसार 376 (2) एनएल 376(3) तसेच बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याच्या कलम 5(3) आणि कलम 10 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करत सक्षपुरावे गोळा करून दोषारोप पत्र न्यायालयात सादर करण्यात आले. यामध्ये पोस्को कायद्या अंतरंग सरकारी वकील म्हंणून रश्मी खापर्डे यांनी पीडितेची बाजू मांडली. यामध्ये पीडित मुलगी ही 16 वर्षाची असून तिचे बौद्धिक वय हे 8 वर्ष आहे. तसेच या पीडित मुलीची गर्भाची डीएनएन चाचणी करण्यात आली. यामध्ये या अहवालात तो आरोपीचा असल्याचा अहवाल आला. यामध्ये दोन्ही बाजू एकूण घेत सुधारित कायद्यानुसार मुलीचे वय 16 वर्षापेक्षा कमी असल्याने आरोपीला 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आली.

हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय -

या प्रकरणात जवळपास 17 साक्षीदार तपासण्यात आले आहे. ज्यामध्ये 20 वर्ष सश्रम कारावास आणि 20 हजारच्या आर्थिक दंड जो पीडितेला देण्यात येईल. यामध्ये महिलांवर वाढत्या अत्याचाराच्या कायद्यातील 2018मधील सुधारनेनुसार कमीत कमी 20 वर्ष शिक्षा असल्याने शिक्षा सुनावण्यात आली. हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय न्यायाधीश केजी राठी यांनी दिला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाने समाजात एक संदेश देण्यात आला आहे. ज्यामुळे महिला अत्याचार आणि लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कमी होण्यास मदत होईल. शिवाय आळा बसण्यास नक्कीच मदत होईल, अशी आशा सरकारी वकील रश्मी खापर्डे यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा- corona update - राज्यात आज ४१९६ कोरोनाचे नवे रुग्ण, १०४ जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.