ETV Bharat / state

Sudhakar Adbale Wins : गडकरी फडणवीसांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबालेंचा दणदणीत विजय - Defeat of former MLA Nago Ganar

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचा विजय झाला आहे. त्यांनी भाजपचे माजी आमदार नागो गाणार यांचा पराभव केला आहे. चुरशीच्या लढतीत महाविकास आघाडीने बाजी मारत भाजपला धुळ चारली आहे. त्यामुळे गडकरी फडणवीसांच्या बालेकिल्यात महाविकास आघाडीने गुलाल उधळला आहे.

Sudhakar Adbale Wins
Sudhakar Adbale Wins
author img

By

Published : Feb 2, 2023, 5:19 PM IST

Updated : Feb 2, 2023, 5:49 PM IST

सुधाकर अडबालेंचा दणदणीत विजय

नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक निकाल जाहीर झाला आहे. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. सुधाकर अडबाले यांनी पहिल्या फेरीतच पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण केल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. सुधाकर अडबाले यांनी भारतीय जनता पक्ष समर्थीत माजी आमदार नागो गाणार यांचा पराभव केला आहे.

अडबाले समर्थकांचा जल्लोष : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक निकालाची प्रतीक्षा संपली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबालें यांचा विजय झाल्याने अडबाले समर्थकांनी जल्लोष करण्यात सुरुवात केली आहे. कार्यकर्त्यांनी ढोलताश्याच्या गजरात गुलालाची उधळण सुरू केली आहे. सुधाकर अडबाले यांनी पहिल्या फेरीत पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण करताच कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. गेल्या एक दशकांपेक्षा अधिक काळापासून नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ भाजपच्या ताब्यात होता. मात्र, अडबाले यांनी अतिशय दमदार विजय मिळवल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपने याचप्रमाणे पदवीधर मतदारसंघ देखील गमावला होता.

कोण आहेत सुधाकर अडबाले : सुधाकर अडबाले हे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नेते असून मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातले आहेत. गणिताचे शिक्षक असलेले अडबाले सुरुवातीपासूनच काँग्रेस विचाराच्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाशी जुळलेले आहेत. गेले अनेक वर्ष ते या निवडणुकीची तयारी म्हणून शिक्षकांसाठी काम करत होते. जुनी पेन्शन साठी त्यांनी अनेक आंदोलन केली असून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळेला मोठा मोर्चा काढून त्याचे नेतृत्व केले होते. जरी महाविकास आघाडी आणि काँग्रेसने त्यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी खूप उशीर लावला असला, तरी अडबाले आधीपासूनच सर्व तयारी करून होते. परिस्थितीचा अंदाज घेऊनच काँग्रेसने आणि महाविकास आघाडीने त्यांना अखेरच्या क्षणी पाठिंबा जाहीर केला आणि अखेर त्यांनी विजय खेचून आणला आहे.

जुनी पेन्शनचा मुद्दा ठरला गेम-चेंजर : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची गेल्या अनेक वर्षांची तयारी, जुनी पेन्शन चा भावनिक विषय आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा शिवाय गाणारां बद्दलची अँटी इन्कमबन्सी हे अडबाले यांच्या विजयात महत्वाचे ठरले आहे. जुनी पेन्शन योजनेला सत्ताधाऱ्यांनी स्पष्टपणे नकार दिल्यामुळे नाराज शिक्षकांनी मतांच्या स्वरूपात आपली नाराजी व्यक्त केली आहे.

नागो गाणारांची हट्रिक हुकली : माजी आमदार नागो गाणार महाराष्ट्राचे शिक्षक परिषदेचे नेते आहे. प्रामाणिक लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख आहे. नागो गाणार गेली दोन टर्म नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून आमदार आहेत. तिसऱ्यांदा नागो गाणार हे निवडणूक जिंकून विजयाची हट्रिक साधतील अशी त्यांच्या समर्थकांना विश्वास होता.

गाणारांना सहकाऱ्यांची नाराजी भोवली : महाराष्ट्राचे शिक्षक परिषदेतून अजय भोयर आणि इतर कार्यकर्त्यांनी ही उमेदवारी मागितली होती. मात्र गाणार यांनी कोणाचीही डाळ शिजू दिली नाही आणि उमेदवारी स्वतःकडे ठेवली. शिवाय भाजपमधील शिक्षक आघाडी मधून ही त्यांच्या उमेदवारीला विरोध होता. मात्र अखेरीस गाणार हेच उमेदवार झाले. भाजपनेही त्यांना शेवटच्या क्षणाला आपला पाठिंबा जाहीर केला होता.

जुनी पेन्शनचा मुद्दा ठरला गेम-चेंजर : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची गेल्या अनेक वर्षांची तयारी, जुन्या पेन्शनचा भावनिक विषय आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा शिवाय गाणारां बद्दलची अँटी इन्कमबन्सी हे अडबाले यांच्या विजयात महत्वाचे ठरले आहे. जुनी पेन्शन योजनेला सत्ताधाऱ्यांनी स्पष्टपणे नकार दिल्यामुळे नाराज शिक्षकांनी मतांच्या स्वरूपात आपली नाराजी व्यक्त केली आहे.

गाणारांना सहकाऱ्यांची नाराजी भोवली : महाराष्ट्राचे शिक्षक परिषदेतून अजय भोयर आणि इतर कार्यकर्त्यांनी ही उमेदवारी मागितली होती. मात्र गाणार यांनी कोणाचीही डाळ शिजू दिली नाही. शिवाय भाजपमधील शिक्षक आघाडीमधून ही त्यांच्या उमेदवारीला विरोध होता. मात्र अखेरीस गाणार हेच उमेदवार झाले. भाजपनेही त्यांना शेवटच्या क्षणाला आपला पाठिंबा जाहीर केला होता.

नागो गाणार यांचा परिचय : माजी आमदार नागो गाणार हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खास विश्वासू मानले जातात. एक प्रामाणिक लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख असली तरी त्यांच्यात शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक आक्रमकता नाही असा ठपका त्यांच्यावर ठेवला जातो.

राजेंद्र झाडेंची लोकप्रियता घटली : राजेंद्र झाडे हे शिक्षक भारतीचे उमेदवार असून नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या मागील निवडणुकीत ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. शिवाय नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतही ते उभे झाले होते. मात्र, काँग्रेसच्या मागणीनंतर त्यांनी काँग्रेस उमेदवार अभिजित वंजारीसाठी माघार घेतली होती. यंदा त्यांना काँग्रेसच्या पाठिंब्याची अपेक्षा होती. काँग्रेसने अखेरच्या क्षणापर्यंत त्यांना पाठिंबा न दिल्यामुळे त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. मात्र, या निवडणुकीत त्यांना अपेक्षे पेक्षा कमी प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. झाडेंना मिळालेले कमी मत हे अडबालेच्या विजयामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - MLC Election Result : कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचा डंका, ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

Last Updated : Feb 2, 2023, 5:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.