नागपूर - जनतेला आणि शेतकऱ्यांसाठी दिलेल्या वचनाला आमचे सरकार कटीबद्ध आहे. शेतकऱ्यांना दिलेल्या २ लाखापर्यंतच्या कर्जमाफीवरच आम्ही थांबणार नसून, राज्यातील शेतकरी चिंतामुक्त करण्यासाठी प्रयत्न करणारक असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. येणाऱ्या मार्च २०२० पासून महात्मा फुले कर्जमाफी योजना सुरु होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच मंत्रीमंडळाचा विस्तारही लवकरच करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
नागपूरमध्ये १६ डिसेंबरपासून सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाची आज सांगता झाली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या अधिवेशनात महत्वाचे निर्णय घेतल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
हे घेतले महत्वाचे निर्णय
१) १० रुपयात थाळी (शिवभोजन योजना) ५० ठिकाणी केंद्र उभारणार
२) जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्यमंत्री कार्यालय उभारणार, मुंबईच्या कार्यलयाशी कनेक्ट
४) विदर्भातील जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करणार
५) धान उत्पादक शेतकऱ्यांना २७०० रुपये मिळणार , २०० रुपयांची वाढ केली
फडणवीस सरकारपेक्षा आमच्या सरकारची कर्जमाफी मोठी - जयंत पाटील
१) फडणवीस सरकारपेक्षा आमचा कर्जमाफीचा आकडा मोठा
२)शेतकऱ्यांना हेलपाटे घालावे लागणार नाहीत
३) कोणतीही अट न घालता ही कर्जमाफी
४) ऑनलाईन नोंदणी करण्याची गरज नाही
५) रांगेत उभे राहण्याची गरज नाही
६) हा निर्णय धाडसाने घेतला आहे.