ETV Bharat / state

Ajit Parse: महाठग अजित पारसे चौकशीसाठी मेडिकली फीट, पोलीस आयुक्तांची माहिती - Parse medically fit for investigation

गेली अनेक दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर अजित पारसे (Ajit Parse) आता पोलिसांना स्टेटमेंट देण्यासाठी मेडिकली फिट झाला आहे. तसा वैद्यकीय अहवालचं पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यामुळे पोलीस अजित पारसेची लवकरचं चौकशी करतील अशी माहिती नागपूर शहर पोलीस (Nagpur City Police) आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.

Ajit Parse
महाठग अजित पारसे चौकशीसाठी मेडिकली फीट, पोलीस आयुक्तांची माहिती
author img

By

Published : Nov 23, 2022, 8:25 PM IST

नागपूर: महाठग अजित पारसेला नागपूर पोलीस बेड्या ठोकतील का, असा एक प्रश्न सर्वसामान्य नागपूरकारांच्या मनात घोंघावतोय. मात्र, आता या प्रश्नाचे उत्तर लवकरचं मिळण्याची अपेक्षा आहे. गेली अनेक दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर अजित पारसे (Ajit Parse) आता पोलिसांना स्टेटमेंट देण्यासाठी मेडिकली फिट झाला आहे. तसा वैद्यकीय अहवालचं पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यामुळे पोलीस अजित पारसेची लवकरचं चौकशी करतील अशी माहिती नागपूर शहर पोलीस (Nagpur City Police) आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.

महाठग अजित पारसे चौकशीसाठी मेडिकली फीट, पोलीस आयुक्तांची माहिती

अजित पारसे गेले 42 दिवस या न त्या कारणाने रुग्णालयात उपचार घेत आहे. राजकीय नेत्यांशी आणि बड्या अधिकाऱ्यांशी जवळीक असल्याचं सांगून कोट्यवधी रुपये वसूल करणारा महाठग अजित पारसेच्या तब्येतीत सुधारणा झाली असल्याचा वैद्यकीय अहवाल नागपूर पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यामुळे भविष्यात त्याला अटक होऊ शकते. अजित पारसेची चौकशी आद्यपही होऊ शकलेली नाही, त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरं अजूनही पोलिसांना त्याच्याकडून मिळणे बाकी आहे.

पारसे विरुद्ध दोन तक्रारी: महाठग अजित पारसेने अनेकांना गंडा घातला असा संशय पोलिसांना आहे. मात्र, आतापर्यंत दोनच तक्रारी त्याच्या विरोधात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे ज्यांना अजित पारसेने गंडा घातला असेल त्यांनी कोणतीही भीती न बाळगता पुढे येऊन तक्रार दाखल करावी असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केले आहे..

एकूण घटनाक्रम: होमिओपॅथी डॉक्टरच्या तक्रारीवरून नागपूर पोलिसांनी १२ ऑक्टोबर रोजी अजितच्या निवासस्थानी धाड टाकली होती. त्यावेळी तो गंभीर आजाराने ग्रासले असल्याने त्याला अटक करणे शक्य नसल्याने पारसेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. चार दिवस उपचार झाल्यानंतर सुट्टी मिळाल्यानंतर घरी परतला तेव्हा त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केलं, तिथे सुद्धा अजित पारसेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याची अटक लांबणीवर पडली होती.

डॉक्टरची साडे चार कोटींची फसवणूक: नागपूरच्या महाल परिसरातील डॉक्टर राजेश मुरकुटे असे फसवणूक झालेल्या फिर्यादीचे नाव आहे. फिर्यादी डॉक्टर मुरकुटे यांची अजित पारसेशी २०१९ मध्ये ओळख झाली होती. तेव्हा डॉक्टरने होमिओपॅथी रुग्णालय सुरू करण्याचा मानस असल्याचे अजित पारसेला सांगितले. माझी मुंबई, दिल्लीसह देशातील अनेक राजकीय पक्षातील नेत्यांसोबत जवळचे संबंध असल्याचं सांगून तुम्हाला परवानगी मिळवून देतो असे सांगून स्वतःच्या जाळ्यात ओढले. गेल्या दोन वर्षात अनेक कारणे सांगून आरोपींने डॉक्टरकडून सुमारे साडे चार कोटी रुपये वसूल केले. स्वतःची फसवणूक झाल्याचं समजताचं डॉक्टर मुरकुटे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात अजित पारसेविरुद्ध फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली.

सोशल मीडियाचा इन्फल्यूसर, विश्लेषक आणि तज्ज्ञ म्हणून मिरवणारा अजित पारसे बड्या शासकीय अधिकाऱ्यांसह शहरातील नामांकित डॉक्टरांना हनीट्रॅपमध्ये अडकवून कोट्यवधी रुपये उकळल्याची माहिती तपासादरम्यान पुढे आली असल्याचं नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले. फसवणूकीची रक्कम सुमारे 25 कोटी रुपये असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

अजित पारसेने अनेकांना सीबीआय चौकशीची धमकी देऊन कोट्यवधी रुपये वसूल केल्याची बाब पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. माझी पंतप्रधान कार्यालय, सीबीआयमध्ये ओळख आहे. तुमच्या विरुद्ध सीबीआयची गुप्त चौकशी सुरू असून तुम्हाला अटक सुध्दा होऊ शकते अशी भीती दाखवून अजित पारसेने अनेकांना लुटल्याचे पुढे आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.