ETV Bharat / state

Devendra Fadnavis : विद्यार्थ्यांवरील पोर्नोग्राफीच्या परिणामांची सरकारला चिंता, बृहत कार्यक्रम तयार करणार - फडणवीस - pornography on school students

सध्या इंटरनेटमुळे विद्यार्थ्यांच्यावर पोर्नोग्राफीचा वाईट परिणाम होत ( pornography viewing increase )आहे. त्यावर सरकारने चिंता व्यक्त केली ( pornography effects school students ) आहे. याबाबत आमदार उमा खापरे यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी मांडली होती. त्यानंतर फडणवीस यांनी उपायासाठी बृहत कार्यक्रम तयार करणार ( Maharashtra government comprehensive program ) असल्याचे सांगितले.

बृहत कार्यक्रम तयार करणार - फडणवीस
बृहत कार्यक्रम तयार करणार - फडणवीस
author img

By

Published : Dec 21, 2022, 12:01 PM IST

Updated : Dec 21, 2022, 3:05 PM IST

नागपूर : विधान परिषदेत आज एका महत्वपूर्ण लक्षवेधीवर चर्चा झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शालेय विद्यार्थ्यांमध्ये इंटरनेटच्या माध्यमातून पसरत चाललेल्या दुष्प्रभावाचा उल्लेख केला. शालेय मुलांमध्ये पॉर्नोग्राफी पाहण्याचे प्रमाण वाढले आहे, असे ते ( pornography viewing increase ) म्हणाले. परिणामी अतिप्रसंगाच्या प्रमाणात भर पडतेय, अशीही पुष्टी त्यांनी जोडली. राज्य सरकार यावर उपाय म्हणून बृहत कार्यक्रम तयार करणार आहे. तसेच स्वयंसेवी संस्था, पोलिसांमार्फत मार्गदर्शन आणि जनजागृती केली जाईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना केल्या जातील. शाळा व्यवस्थापन समितीचे ऑडिट करत आहोत, असेही त्यांनी सांगितले. अतिप्रसंगाची विकृती ठेचण्यासाठी उपसभापती यांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करू, असेही ते म्हणाले. उमा खापरे यांनी राज्यातील शाळांमध्ये वाढत्या अत्याचाराच्या घटना आणि पोर्नोग्राफीबाबत लक्षवेधी मांडली ( Legislative Council Discussion on important point children ) होती. प्रवीण दरेकर, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, शशिकांत शिंदे यांनी चर्चेत भाग घेतला.

व्हेंचर बृहत कार्यक्रम : मोबाईलमुळे पोर्नोग्राफी व्हिडीओ पाहून अतिप्रसंगाच्या घटना शालेय मुलांमध्ये वाढीस लागल्या ( pornography effects school students ) आहेत. सरकारने अशा घटना रोखण्यासाठी कंबर कसली असून लवकरच शालेय व्हेंचर बृहत कार्यक्रम तयार केला जाईल, अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मुलांचे, पालकांचे समुपदेश, सुरक्षेच्यादृष्टीने शालेय आवारात सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना ही प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच बीड, अकोल्यातील शाळांबाहेरील कॅफेंसंदर्भात दोन सदस्यीय समिती नेमून तोडगा काढला जाईल, असे आश्वासन ही फडणवीस यांनी यावेळी ( Maharashtra government comprehensive program ) दिले.

मोबाईलमुळे विद्यार्थ्यांमध्ये अतिप्रसंगाच्या घटना वाढीस : भाजपच्या विधान परिषदेच्या सदस्या उमा खापरे यांनी राज्यातील शालेय मुलांमध्ये पोर्नोग्राफी बघण्याचे वाढते प्रमाण, त्यातून वाढलेल्या अतिप्रसंगाच्या घटनांकडे लक्षवेधीच्या माध्यमातून विधान परिषदेचे लक्ष वेधले. शाळेतील मुलांना मोबाईल देवू नका, पालकांचे समुपदेशन करावे, अशी सूचना केली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य प्रवीण दरेकर, शशिकांत शिंदे यांनी या सूचनेला पाठिंबा देत, राज्यातील शाळा आणि शाळा बाहेरील आक्षेपार्ह प्रकारांकडे लक्ष वेधले.

कॅफेमधील व्यवस्था गुन्हेगारीस पोषक : शाळांबाहेर गुटखा, तंबाखू विक्री होते. चॉकलेट, बिस्कीटचे लालच दाखवून मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले ( cafe atmosphere conducive crime ) जाते. लव्ह जिहादचे प्रकार यामुळे वाढीस लागले आहेत. राज्य शासनाने विशेष यंत्रणा वापरुन त्यावर निर्बंध आणावेत. शाळा, पालकांच्या समित्या नेमून कालबध्द यंत्रणा तयार करुन, अशा घटनांवर अंकुश आणावा, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, शालेय विद्यार्थ्यांना संरक्षणाचे धडे द्यावेत, सर्व शालांत सीसीटीव्ही लावावेत, लैगिंक शिक्षणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. तसेच बीड, अकोला जिल्ह्यातील शाळांबाहेरील कॅफेकडे लक्ष वेढले. कॅफेमधील व्यवस्था गुन्हेगारी वाढीस हातभार लावत असून अशांवर निर्बंध आणावा, अशी सूचना केली. शशिकांत शिंदे यांनी, शालेत व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यास टाळाटाळ केली जाते. ती बैठक दर महिन्याला घेण्यात यावी, वाहन चालकांचे ऑडीट करुन काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी सूचना केली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधीवर उत्तर दिले.

विकृती ठेचणार : राज्यात पोर्नोग्राफी पाहण्याचे प्रकार मोठ्या संख्येने वाढले आहे. केंद्र सरकारने पोर्नोग्राफी हटवण्याचे काम सुरु केले आहे. तसेच राज्यात सायबर कॅम्प तयार आहेत. शालांतील मुले आणि पालकांना पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांकडून मार्गदर्शन आणि सर्व शालांत जनजागृती करण्यात (violence in students Incident increased ) येईल. तसेच शालेय समित्यांसाठी उपाययोजना सुरु असल्या तरी अपूर्ण आहेत. त्यामुळे प्रवृत्ती वाढूनही त्यावर कंट्रोल होत नाही. त्यामुळे शालेय व्हेंचर बृहत कार्यक्रम तयार करु, अशी ग्वाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सर्वच शालांत टप्पाटप्प्याने सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना दिल्या जातील. शाळेच्या आवारातील कॅफेंवर लक्ष देण्यासाठी दोन सदस्यीय समिती नेमून तोडगा काढू, असे गृहमंत्री म्हणाले. वाहन चालकांच्या ऑडिटसाठी लवकरच यंत्रणा उभी करु. तसेच अतिप्रसंगाच्या वाढत्या विकृती ठेचून काढण्यासाठी सरकार कटीबद्ध असून उपसभापतींनी सुचवलेल्या पाच सूचनांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

Last Updated : Dec 21, 2022, 3:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.