ETV Bharat / state

Maharashtra Cabinet Expansion : मंत्रीमंडळाचा विस्तार कधी होणार? फडणवीसांनी थेटच सांगितले.... - एकनाथ शिंदे

राज्यातील सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी रात्री दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील मंत्रीमंडळाच्या विस्तारावर चर्चा करण्यात आली आहे.

Eknath Shinde and Devendra Fadnavis
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Jun 5, 2023, 5:06 PM IST

नागपूर : शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी ही महिती दिली. 'महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. तो कधी होणार याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे घेतील,' असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

  • 🕑2.14pm | 05-06-2023 📍Nagpur | दु. २.१४ वा. | ०५-०६-२०२३📍नागपूर
    LIVE | Media interaction https://t.co/QUQms8lK6r

    — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दिल्लीत अमित शाहंशी चर्चा : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजप आगामी सर्व निवडणुका एकत्र लढतील, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात दिल्लीत नुकतीच एक बैठक झाली होती. या बैठकीत यावर चर्चा झाली, असे ते म्हणाले. गेल्या वर्षी 9 ऑगस्ट रोजी राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर शिंदे - फडणवीस सरकारमध्ये 18 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला होता. नियमानुसार राज्यातील मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 43 सदस्य असू शकतात.

  • काल, रविवारी रात्री मी आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी दिल्लीत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री @AmitShah यांची भेट घेतली.

    कृषि, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू असून अनेक रखडलेले… pic.twitter.com/MdLoqiPoy2

    — Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'आगामी निवडणुका एकत्र लढणार' : एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळाच्या विस्तारासाठी ठराविक मुदत दिली नव्हती. तत्पूर्वी, शिंदे यांनी एका ट्विटमध्ये माहिती दिली की, रविवारी रात्री ते आणि देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली.

काल, आम्ही (शिवसेना आणि भाजप) आगामी सर्व निवडणुका एकत्र लढण्याबाबत आणि एकत्रित रणनीती आखण्याबाबत चर्चा केली. दोन्ही पक्षांमध्ये तालुक्यांमध्ये आणि जिल्ह्यांतील समन्वयावरही आम्ही चर्चा केली. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

'दिल्लीला गेलो तर काय बिघडले?' : काँग्रेस नेते नाना पटोले आणि शिवसेना उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, 'पटोले यांच्या पक्षात एखाद्याला प्रार्थना सभेला जाण्यासाठीही हायकमांडची परवानगी लागते. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. मी दिल्लीला गेलो तर त्यात काय बिघडले?' छत्रपती संभाजीनगर शहरातील मिरवणुकीत औरंगजेबाच्या फोटोच्या कथित प्रदर्शनाबद्दल विचारले असता राज्याचे गृहमंत्री फडणवीस म्हणाले की, 'असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही'.

हेही वाचा :

  1. Ajit Pawar on Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीवर अजित पवारांची टीका; म्हणाले...
  2. Sanjay Raut : फडणवीसांचा मक्का मदीना दिल्लीत पण, शिंदे गटाची दिल्तीत मुजरा घालून गुलामी - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.