नागपूर औरंगाबादच्या नामांतरावरुन राज्यातील राजकारण पेटले आहे. औरंगाबाद शहराचे नाव बदलू नये, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसने मांडली आहे. याबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारणा केली असता ते म्हणाले, नामांतरणाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. पण, सरकारने जनतेच्या भावनेचे आदर करत योग्य तो निर्णय घ्यावा.
पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडणार
नागपूर येथील विधानभवनात विधीमंडळ कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमानंतर 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीशी बोलत होते. त्यांना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचे त्याबाबत त्यांना विचारणा केल्यास पटोले म्हणाले, मी विधानसभेच्या अध्यक्षपदाचीही मागणी पक्षाकडे केली नव्हती. आता प्रदेशाध्यक्षपदाबाबतही बोलणार नाही. पक्ष जी जबाबदारी देईन ती मी प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचेही पटोले म्हणाले.
हेही वाचा - ऊर्जामंत्र्यांच्या घराला घेराव घालण्यासाठी निघालेल्या आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की
हेही वाचा - नागपूर शहरातील शाळांची पहिली घंटा वाजली; तब्बल १० महिन्यांनी शाळा सुरू