ETV Bharat / state

उमरेडमध्ये बंदुकीचा धाक दाखवून माजी नगरसेवकाच्या घरी लूटमार - nagpur latest news

नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे माजी नगरसेवक अरुण गिरटकर यांच्या घरी गुरुवारी (दि. 18) सायंकाळच्या सुमारास लुटमार झाली आहे.

घटनास्थळ
घटनास्थळ
author img

By

Published : Feb 20, 2021, 10:13 PM IST

नागपूर - जिल्ह्यातील उमरेड येथे माजी नगरसेवक अरुण गिरटकर यांच्या घरी गुरुवारी (दि. 18) सायंकाळच्या सुमारास लुटमार झाली आहे. गिरडकर यांच्या पत्नीला बंदुकीचा धाक दाखवून दोन अज्ञात आरोपींनी लाखोंचा ऐवज लंपास करत पोबारा केला आहे. गिरडकर यांच्या इमारतीच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपीच्या हालचाली कैद झाल्या असून त्या आधारे उमरेड पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

घटनास्थळ

माजी नगरसेवक अरुण गिरटकर फिरायला गेले होते. त्यावेळी त्यांची पत्नी विमल गिरडकर या एकट्याच घरी होत्या. सायंकाळी साडेसातच्या सुमारास दोन चोरटे घरात शिरले. त्यांनी विमल यांच्या डोक्यावर बंदूक लावून घरी चोरी केली. घरातील दागिने आणि रोकड, असा सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. उमरेड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. सीसीटीव्हीच्या आधारावर पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

हवं ते घेऊन जा, पण मला मारु नका

ज्यावेळी दोन्ही चोरटे गिरडकर यांच्या घरात शिरले तेव्हा त्यापैकी एकाने विमल गिरडकर यांच्या डोक्याला बंदूक लावली होती तर दुसऱ्याने त्यांचे हात बांधले तेव्हा विमल गिरडकर यांनी हवं ते घेऊन जा मात्र मारू नका, अशी विनवणी केली. त्यानंतर आरोपींनी विमल गिरडकर यांच्या गळ्यातील दागिन्यांसह घरात ठेवलेली रोकड घेऊन पोबारा केला. ज्यावेळी अरुण गिरटकर घरी परत आले तेव्हा संपूर्ण घटना त्यांच्या पत्नीने त्यांना सांगितली. त्यानंतर लगेच या संदर्भात उमरेड पोलिसांना सूचना देण्यात आली.

हेही वाचा - किरकोळ वादातून तिघांनी केला सहकार्याचा खून; आरोपींना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.