ETV Bharat / state

नागपूर लोकसभा : भाजपचे नितीन गडकरी विजयी, तर काँग्रेसचे नाना पटोले यांचा पराभव - भाजप

भाजपचे नितीन गडकरी याची विजया कडे वाटचाल सुरु होती. मात्र, नितीन गडकरी यांचा विजय झाला आहे. त्यांनी काँग्रेसचे नाना पटोले यांना पराभूत केले.

नितीन गडकरी, मनोहर डबरासे आणि नाना पटोले
author img

By

Published : May 23, 2019, 6:00 AM IST

Updated : May 23, 2019, 7:38 PM IST

LIVE UPDATES -

  • सा.7.20 वा - नितीन गडकरी यांचा विजय झाला आहे. त्यांनी काँग्रेसचे नाना पटोले यांना पराभूत केले.
  • दु.५.20 वा - नितीन गडकरी नवव्या फेरीच्या अखेरीस ९४ हजार १११ मतांनी आघाडीवर
  • दु. ४.०० वा. - नितीन गडकरी ९८ हजार मतांनी आघाडीवर
  • दु. ३.०० वा. - सहाव्या फेरीअंती नितीन गडकरी ८१ हजार मतांनी आघाडीवर
  • दु. १.२८ वा. - नितीन गडकरी चौथ्या फेरीच्या अखेरीस ५८ हजार मतांनी आघाडीवर
  • स. ११.०४ वा. - दुसऱ्या फेरीत नितीन गडकरी ३३ हजार मतांनी आघाडीवर
  • स. १०.०३ वा. - भाजपचे नितीन गडकरी पहिल्या फेरीत १५ हजार ६२२ मतांनी आघाडीवर
  • स. ९.२९ - टपाल मतदानामध्ये भाजपचे नितीन गडकरी आघाडीवर
  • स. ८.४० - भाजपचे नितीन गडकरी आघाडीवर
  • स. ८.२६ वा. - उत्तर नागपूर विधानसभा आणि दक्षिण नागपूर विधानसभा मतारसंघातील प्रत्येकी एका ईव्हीएम मशीनच्या कंट्रोल यूनिटच्या क्रमांकामध्ये तफावत असल्याचा काँग्रेस पक्षाचा आरोप. मतमोजणी प्रक्रिया थांबवण्याची मागणी
  • स. ८.०० वा - मतमोजणीला सुरुवात

नागपूर - संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या गडाला खिंडार पाडण्यात काँग्रेस यशस्वी होणार का? याचा फैसला आज होणार आहे. थोड्याच वेळात शहरातील पंडीत जवाहरलाल नेहरू मार्केट यार्ड येथे मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या ठिकाणी भाजपकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रिंगणात होते, तर त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून नाना पटोले यांनी रिंगणात उतरून ही निवडणूक चुरशीची केली. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मनोहर डबरासे यांनी सामन्यात तिहेरी रंगत आणण्याचा प्रयत्न केला असला तरी खरी लढत गडकरी आणि पटोले यांच्यातच होती.

नागपूर लोकसभा मतदारसंघात ११ एप्रिलला मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत ५४.७४ टक्के मतदानाची नोंद करण्यात. २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत हा टक्का २ टक्क्यांनी घटला आहे. मात्र, आता मतदानातील ही घट कुणाच्या पथ्थ्यावर पडणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

या मतदारसंघाच्या निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलेले आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघानंतर भाजपसाठी नागपूर देशातील सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय याच मतदारसंघात आहे. शिवाय मोदींनंतर पंतप्रधान पदासाठी भाजपचा चेहरा असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा हा मतदारसंघ आहे. त्यामुळेच नागपूरची लढत भाजपसाठी प्रतिष्ठेची आणि तेवढीच महत्त्वाची आहे. या मतदारसंघात नितीन गडकरींना भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या नाना पटोले यांनी आव्हान दिले. आता जातीय समीकरणावरून पटोले गडकरींवर कुरघोडी करणार, की गडकरी आपला विजय कायम ठेवणार, हे थोड्याच कळणार आहे.

जातीय समिकरणाची गोळा बेरीज न करता विकासाच्या मुद्द्यांना महत्व देत गडकरींनी या मतदारसंघात विजयाचा दावा केला आहे. तर भाजपला खडे बोल सुनावून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या नाना पटोले यांनी गडकरींपुढे कडवे आव्हान निर्माण केल्याचे चित्र या मतदारसंघात दिसून आले. नाना पटोले हे नागपूरच्या मतदारांसाठी बाहेरचे उमेदवार असले तरी नितीन गडकरींना त्यांनी चांगलीच लढत दिली.

२०१४ ची परिस्थिती -
गेल्या २०१४ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवली होती. पहिल्याच लढतीत त्यांनी २ लाख ८४ हजार मतांनी काँग्रेसच्या विलास मुत्तेमवार यांचा पराभव केला होता, तर गोंदिया-भंडारा मतदारसंघातून भाजपकडून नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना पराभूत केले होते. मात्र, पटोले यांनी भाजपच्या खासदार पदाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
२०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसने याच पटोलेंना नागपुरातून गडकरीविरोधात रिंगणात उभे केले होते. त्यामुळे पटोले हे गडकरींवर मात करणार का? की गडकरी विजयाचा झेंडा कायम ठेवणार? हे आजच स्पष्ट होणार आहे.

Intro:Body:

dummy

Conclusion:
Last Updated : May 23, 2019, 7:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.