नागपूर - महापालिका हद्दीच्या बाहेरील भागात काल (शुक्रवार)पासून दारू विक्रीला सुरुवात करण्यात आली होती. मात्र या भागात शहरातील तसेच त्या भागातील तळीरामांनी मोठी गर्दी केली. यामुळे प्रशासनानाला २४ तासातच दारू विक्रीचा निर्णय बदलावा लागला आणि नविन सुधारित आदेश काढावा लागला. नव्या आदेशानुसार आता ग्रामीण भाग असो की शहरी दारू विक्री ऑनलाईन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रशासनाने शहरातील परवानाधारकांच ऑनलाईन पद्धतीने दारू खरेदीसाठी मूभा दिली आहे. यामुळे परवानाधारक सोडल्यास इतर लोक दारूची खरेदी करू शकत नव्हते. यानंतर प्रशासनाने शुक्रवारी नागपूर महानगरपालिका हद्दीच्या बाहेर, नागपूर पोलीस आयुक्त यांच्या कार्यक्षेत्रातील अर्धशहरी आणि अर्धनागरी भागात दुकानातून मद्य विक्रीसाठी परवानगी दिली होती.
पण नागपूर शहराजवळच्या हिंगणा, वाडी, खापरी आणि कामठी या परिसरात नागपुरातील तळीरामांनी मोठी गर्दी करत फिजीकल डिस्टन्सिंगच्या नियमाचा फज्जा उडवला होता. यामुळे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज सकाळी सुधारित आदेश काढत नागपूर महापालिका हद्दीच्या बाहेरील मात्र पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रातील मोडणाऱ्या हिंगणा, वाडी, खापरी आणि कामठी या भागात दुकानातून मद्यविक्रीची दिलेली परवानगी रद्द करत इथल्या मद्य विक्रेत्यानी फक्त ऑनलाईन मद्यविक्री करावी, असे आदेश काढले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे जे मद्यप्रेमी नागपूर शहराच्या जवळच्या हिंगणा, वाडी, खापरी आणि कामठी या भागात जाऊन मद्य खरेदीचे स्वप्न पाहात होते. त्यांना आता ऑनलाईन मद्य खरेदीच करावी लागणार आहे.
हेही वाचा - केंद्र सरकारने वीज कंपन्यांना पॅकेज कर्जस्वरुपात दिल्यास बोजा ग्राहकांवर पडेल - नितीन राऊत
हेही वाचा - दिलासादायक बातमी.. नागपुरात २४ तासात तब्बल ८१ रुग्ण कोरोनामुक्त..