नागपूर - अवैधरित्या दारू विक्रीचे कारभार दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याच पार्श्वभूमीवर येथील कुख्यात दारूविक्रेता सुमित उर्फ जॉन शिंदे या जरीपटका पोलिसांनी तडीपार केले आहे. जॉन शिंदेकडून शहरातील विविध भागात अवैध रित्या दारुविक्री केल्या जात होती. शिवाय जॉन विरोधात आतापर्यंत 14 गुन्ह्याच्या नोंदी आहेत. याच पार्श्वभूमीवर जरीपटका पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
शहरातील गुन्ह्याचे प्रमाण अधिकच वाढत असल्याचे चित्र आहे. अशात अवैधरित्या दारुविक्री करणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर शहरातील जरीपटका परिसरातील कुख्यात दारुविक्रेता जॉन शिंदे याला तडीपार करण्यात आले आहे. जॉन शिंदे गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरित्या दारु विक्रीसह विविध गुन्हे करत होता. याच अनुषंगाने जरीपटका पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जॉन शिंदे याचावर आतापर्यंत 14 गंभीर गुन्ह्याची नोंद झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानुसारच जॉनला 6 महिन्यांसाठी तडीपार करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर जॉनकडून इतरही छोटे मोठे अवैध धंदे आणि हाणामारीचे प्रकरण वारंवार पुढे येत होते. याच गुन्ह्यांची दखल घेत ही कारवाई करण्यात आल्याचे जरीपटका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खुशाल तिजारे यांनी सांगितले.