ETV Bharat / state

Leopard Wandering : नागपुरातील वाडी परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

author img

By

Published : Dec 5, 2021, 5:33 PM IST

Updated : Dec 5, 2021, 5:42 PM IST

बिबट्याच्या हजेरीने ( Leopard Wandering Wadi Nagpur ) पुन्हा एकादा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी ऑटोमिक एनर्जीडेपोच्या भिंतीवर ( Atomic Energy Depot Wall ) हा बिबट आल्याचे सीसीटीव्हीत दिसून आल्यानंतर चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. कारण येथून अगदी हाकेच्या अंतरावर आंबेडकर नगर ( Ambedkar Nagar ) ही लोकवस्ती आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असलेल्या भागात हा बिबट्या दिसल्याने चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे.

वाडी परिसरातील बिबट
वाडी परिसरातील बिबट

नागपूर - उपराजधानी नागपूर शहराला लागून असलेल्या वाडी परिसरात बिबट्याच्या हजेरीने ( Leopard Wandering Wadi Nagpur ) पुन्हा एकादा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी ऑटोमिक एनर्जीडेपोच्या भिंतीवर ( Atomic Energy Depot Wall ) हा बिबट आल्याचे सीसीटीव्हीत दिसून आल्यानंतर चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. कारण येथून अगदी हाकेच्या अंतरावर आंबेडकर नगर ( Ambedkar Nagar ) ही लोकवस्ती आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असलेल्या भागात हा बिबट्या दिसल्याने चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. असे असले तरी हा बिबट्या ज्या भागातून आला होता, त्या जंगल परिसरात पुन्हा निघून गेल्याची खात्री करून वन विभागाने घाबरण्याची काहीही गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. आंबेडकर नगरला लागूनच परमाणू ऊर्जा मंडळाच्या म्हणजेच ॲटॉमिक एनर्जी डेपो असून त्याच डेपोच्या परिसरात भिंतीवर 1 डिसेंबरच्या संध्याकाळी 6 वाजून 33 मिनिटांनी आणि त्यानंतर 6 वाजून 38 मिनिटांना एक बिबट सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसून आला आहे.

बिबट्याचे वाडी परिसरातील सीसीटीव्ही दृश्य
  • वनविभागाने उचलले 'हे' पाऊल

हा व्हिडिओ समोर येताच वनविभागाने याची संपूर्ण चौकशी करून व्हिडिओ खरा असल्याचा दुजोरा दिला आहे. त्यानंतर वन विभागाकडून खबरदारी म्हणून तत्काळ एसआरपीएफच्या चार नंबरच्या तुकडीला त्या परिसरात पायी फिरून तपासणी केली. ट्रॅप कॅमेऱ्यावरुन सुद्धा ही बाब सत्य असल्याचे दिसून आले. सायंकाळी गस्ती पथकाला जैवविविधता उद्यानाच्या पांढराबोडी भागात हा बिबट प्रत्यक्षात दिसला. त्यामुळे वाडी भागाकडील बिबट्या पांढरा बोडी क्षेत्रात निघून गेल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. हा गस्ती पथक वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष निनावे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाझरी भागाचे राऊंड ऑफिसर एस एफ फुलझेले हे लक्ष ठेवून आहे. या परिस्थितीत नागरिकांना घाबरण्याचे काही कारण नाही, असे आवाहन हिंगणा वनविभागकडून केले जात आहे.

  • यापूर्वीही नोंदवला आहे बिबट्याचा वावर

नागपूर-अमरावती महामार्गावर असलेल्या दाट लोकवस्तीच्या वाडी परिसरात यापूर्वीही बऱ्याचवेळा वेळा बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आला आहे. अंबाझरी ऑर्डनन्स फॅक्टरीच्या परिसरात दोन महिन्यांपूर्वी बिबट्याने अनेक दिवस उपस्थिती दर्शवली आहे. तर अमरावती महामार्गावरून दाभाकडे जाणाऱ्या झाडी झुडुपाच्या रस्त्यावर दीड वर्षापूर्वी बिबट्याला पाहिल्याची चर्चा होती. वाडी परिसराला लागून असलेल्या एमआयडीसीमध्ये ही अनेकांना रात्रीच्या वेळेस बिबट्याचे वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पहिल्यांदा बिबट परिसरातील दाट झाडीत मार्गक्रमण करताना दिसतो. त्यानंतर तोच बिबट डेपोच्या भिंतीवर चालताना दिसला होता. हे सीसीटीव्हीचे फुटेज सध्या व्हायरल झाले आहे. त्यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

हेही वाचा - Nagaland killings: नागालँड पेटले, दहशतवादी समजून सुरक्षा दलाच्या गोळीबारात 11 नागरिकांचा मृत्यू

Last Updated : Dec 5, 2021, 5:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.