ETV Bharat / state

नागपूर : कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट; उपचार घेणाऱ्याची संख्याही घटली

मागील 24 तासातील कोरोनाबाधितांचा अहवाल पाहता 1 हजार 133 जण कोरोनाबाधित मिळून आले. तसेच शहरात केवळ 726 बाधितांची नोंद झाली आहे. तेच उपचार घेणाऱ्यांची संख्या साडे पाच हजरावर आली असल्याने शहरात बेड उपलब्ध होऊ लागले आहे.

large decrease in number of covid patient in nagpur
नागपूर : कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट; उपचार घेणाऱ्याची संख्याही घटली
author img

By

Published : May 17, 2021, 3:02 AM IST

नागपूर - जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या घटत चालली असून दुसरी लाट आता ओसरत आहे. मागील 24 तासातील कोरोनाबाधितांचा अहवाल पाहता 1 हजार 133 जण कोरोनाबाधित मिळून आले. तसेच शहरात केवळ 726 बाधितांची नोंद झाली आहे. तेच उपचार घेणाऱ्यांची संख्या साडे पाच हजरावर आली असल्याने शहरात बेड उपलब्ध होऊ लागले आहे. तर रिकव्हरी रेट 91.71 टक्के एवढा आहे.

4 हजार 519 जण कोरोनामुक्त -

रविवारी आलेल्या अहवालात 15 हजार 554 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये एकूण 1133 बाधित मिळून आले. यामध्ये शहरी भागात रुग्णसंख्या घटून 726 तर ग्रामीण भागात 396 आली आहे. यामध्ये शहरी भागात 9, ग्रामीण भागात 10 तर जिल्हाबाहेरील 11 जण हे कोरोनामुळे दगावले आहे. तेच 4 हजार 519 जण कोरोनामुक्त झाले आहे. सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन 29 हजार 843 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 4 लाख 63 हजार 243 रुग्ण कोरोना बाधित झाले आहे. यातून 4 लाख 24 हजार 850 जण हे कोरोनामुक्त झाले आहे. यात मृत्यूचा आकडा हा 8550 वर जाऊन पोहचला आहे.

पूर्व विदर्भात रुग्णसंख्या घटली -

पूर्व विदर्भात 2 हजार 707 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यात 8 हजार 25 जण नव्याने कोरोनाबाधित मिळून आले आहेत. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील 69 जण हे कोरोनामुळे दगावले आहे. यात बाधितांच्या तुलेनेत 5 हजार 318 जण हे कोरोमुक्त झाले आहे. 9.91 टक्के इतका पॉझिटिव्ह रुग्णसंख्येचा दर आला आहे.

हेही वाचा - हरयाणात पोलीस आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये चकमक; 50 पोलीस जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.