ETV Bharat / state

नागपूर : खापा वनपरिक्षेत्रात मादी बिबट्या आणि शावक मृतावस्थेत आढळल्याने खळबळ

author img

By

Published : Jun 4, 2021, 3:55 PM IST

मोहगाव पेंढरी येथील कोरड्या पडलेल्या नाल्यात वन कर्मचाऱ्यांना गस्तीदरम्यान मादी बिबट आणि तिचा शावक मृतावस्थेत आढळून आला. या संदर्भात वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आले असता ते देखील घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर दोन्ही बिबट्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.

मादी बिबट आढळले मृतावस्थेत
मादी बिबट आढळले मृतावस्थेत

नागपूर - एकीकडे संपूर्ण नागपूर शहरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. अशातच नागपूर जिल्ह्यातील प्रादेशिक वन विभागाच्या खापा वनपरिक्षेत्रात एका मादी बिबट आणि तिचा शावक मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत मादी बिबटचे वय साडे चार वर्ष तर शावकाचे वय अवघे चार महिने असल्याची माहिती पुढे आली आहे. उष्णघात किंवा तहान भूकेने मादी बिबट आणि तिच्या शावकाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज बांधला जातो आहे.

मोहगाव पेंढरी येथील कोरड्या पडलेल्या नाल्यात वन कर्मचाऱ्यांना गस्तीदरम्यान मादी बिबट आणि तिचा शावक मृतावस्थेत आढळून आला. या संदर्भात वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आले असता ते देखील घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर दोन्ही बिबट्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. मृत्यूचे नेमके कारण कळावे या करिता शरीरातील काही भाग फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.

सर्व अवयव शाबूत तरी शंकेला वाव

मृत्यूचे कारण शोधण्यासाठी प्रादेशिक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसराचे सूक्ष्म निरीक्षण केले. त्यांना काहीही आढळले नाही. मादी बिबट आणि तिच्या शावकाचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने हा शिकारीचा प्रयत्न आहे का ? या शंकेला देखील वाव असल्यामुळे त्या अनुषंगाने तपास केला जात आहे.

हेही वाचा-क्राईम कॅपिटल बिबट्याच्या दहशतीने भयभीत, कुत्रा आणि बोक्यात दिसू लागला बिबट्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.