ETV Bharat / state

नगरसेवक ते मुख्यमंत्री... जाणून घ्या देवेंद्र फडणवीसांचा प्रवास - देवेंद्र फडणवीसांचा प्रवास

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलैला (आज) वाढदिवस आहे. सर्वात कमी वयात मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्यांनी नागपूर महानगर पालिकेचे महापौर म्हणून प्रवास सुरु केला.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Jul 22, 2021, 7:33 PM IST

नागपूर - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा आज (22 जुलै) वाढदिवस. आक्रमक आणि अभ्यासू नेता म्हणून ते महाराष्ट्राला परिचित आहेत. वाढदिवसानिमित्त त्यांच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेणारा हा रिपोर्ट.

लहानपणीचे देवेंद्र फडणवीस
लहानपणीचे देवेंद्र फडणवीस
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान
देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस

कमी वयात ते मुख्यमंत्री झाले

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलैला (आज) वाढदिवस आहे. सर्वात कमी वयात मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्यांनी नागपूर महानगर पालिकेचे महापौर म्हणून प्रवास सुरु केला. त्यांना कुटुंबातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले. वडील गंगाधर फडणवीस यांच्याकडून राजकारणाचे धडे मिळाले. तेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही ते अत्यंत सक्रिय स्वयंसेवक राहिले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत त्यांनी विद्यार्थी दशेत आपल्या कामाला सुरुवात केली. अवघ्या 22 वर्षाचे असतांना ते नगरसेवक झाले. दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून येताच ते सर्वात कमी वयाचे तरुण महापौर झाले. 1999 मध्ये ते आमदार झाले. त्यानंतर 2014 मध्ये निवडून येते महाराष्ट्राचे दुसरे तरुण मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली.

कुशल वक्ता म्हणूनही ओळख

देवेंद्र फडणवीस हे उत्तम वक्ते म्हणूनही प्रसिद्ध आहेत. अनेकवेळा ते आपल्या खास भाषणशैलीमुळे चर्चेत असतात. त्यांचा राजकीय अभ्यास आणि कामाची पद्धत यामुळेही ते ओळखले जातात. 2014 च्या निवडणुकीनंतर पाच वर्ष पूर्णकाळ मुख्यमंत्री राहणारे महाराष्ट्रातील दुसरे मुख्यमंत्री ठरले. याच पाच वर्षाच्या काळात त्यांनी विविध मुद्दे निकाली लावले. तर अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी त्यांना धारेवरही धरले. मात्र या सर्व टिकेला त्यांनी आपल्या पद्धतीने हाताळल्याचे काही पत्रकार सांगतात. 2019 च्या निवडणूकीत त्यांनी पुन्हा सत्तास्थापनेसाठी हालीचाली सुरू केल्या. मात्र भाजपा-शिवसेना युती तुटल्यामुळे याचा परिणाम सत्ता स्थापनेवर झाला. त्यामुळे त्यांना या निवडणूकीत सत्ता स्थापन करता आली नाही. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले आणि फडणवीसांना विरोधीपक्षाच्या बाकावर बसावे लागले. विरोधीपक्षाच्या बाकावरूनही ते सरकारला विविध आंदोलनाच्या माध्यमातून धारेवर धरतांना दिसून येत आहे.

हेही वाचा - #AnilDeshmukh : ईडीपाठोपाठ आता सीबीआय करणार अनिल देशमुखांची चौकशी?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.