नागपूर- नागपूर शहरात वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग अनेकांच्या जिवावर उठला आहे. पोलिसांना देखील आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे खरे कोरोना योद्धा असलेल्या पोलिसांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिनाभरात तब्बल १२ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे, आता पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये ऑक्सिजन मोजण्याच्या मशीनसह सगळ्या सुविधा पुरवल्या जात आहे.
काही दिवसांपूर्वीच पोलिसांना बेड मिळत नसल्याचे बघून पोलीस आयुक्तांनी पुढाकार घेत प्रशासनाची झाडाझडती घेतली होती. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी पोलीस जिवाचे रान करून सेवा देत आहेत. त्यामुळे, त्यांना वैद्यकीय सेवा मिळणे गरजेचे आहे. पोलिसांना कोरोनापासून सुरक्षा मिळावी या उद्देशाने प्रत्येक पोलीस ठाण्यात ऑक्सिजन पातळी मोजण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यात येताच कर्मचाऱ्यांना आपली ऑक्सिजनची पातळी मोजणे अनिवार्य करण्यात आले आहे.
हेही वाचा- नागपुरात मंगळवारी सर्वाधिक कोरोना रुग्णांची भर; 'इतके' जण कोरोनामुक्त