ETV Bharat / state

नागपूर : भरधाव इनोव्हाची ई-रिक्षाला धडक; रिक्षा चालकाचा मृत्यू - innova car e rikshaw accident nagpur

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, इनोव्हा कारची गती जास्त होती. त्याचवेळी समोरून येणाऱ्या ई-रिक्षाला इनोव्हा गाडीने जोरदार धडक दिली. यात ई-रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

innova and e rikshaw accident
इनोव्हाची ई-रिक्षाला धडक
author img

By

Published : May 19, 2021, 3:34 PM IST

Updated : May 19, 2021, 10:38 PM IST

नागपूर - शहरातील इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका वेगवान अनियंत्रित इनोव्हा कारने ई-ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत ऑटो चालकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना बैद्यनाथ चौकातील ग्रेट नाग रस्त्यावर घडली. वामनराव पराते (वय - ५९) असे मृताचे नाव आहे. तर आनंद अरकेल असे इनोव्हा चालकाचे नाव आहे.

स्थानिकांकडून पोलिसांना अपघाताची माहिती -

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, इनोव्हा कारची गती जास्त होती. त्याचवेळी समोरून येणाऱ्या ई-रिक्षाला इनोव्हा गाडीने जोरदार धडक दिली. यात ई-रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. त्यानंतर इनोव्हा गाडी अनियंत्रित होऊन दुभाजकावर उलटी झाली. या अपघातात इनोव्हा चालकाला देखील दुखापत झाली आहे. स्थानिकांच्या मदतीने इनोव्हा चालकाला बाहेर काढण्यात आल्यानंतर पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली.

हेही वाचा - नागपुरात आतापर्यंत म्युकरमायकोसिसने 26 रुग्णांचा मृत्यू, 600 जणांना बाधा

अपघातामुळे बैद्यनाथ चौकातील वाहतूक काही काळ खोळंबली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी इनोव्हा चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे.

Last Updated : May 19, 2021, 10:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.