नागपूर : जामठा मैदानावरील खेळपट्टी (पिच) संदर्भात ऑस्ट्रेलियन मीडियाने काही शंका उपस्थित केली असून, त्याला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने एका वाक्यात उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, आम्ही खेळपट्टीवर नव्हे तर सामन्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. मैदानावर खेळणारे सर्व 22 खेळाडू सक्षम आहेत. 2008 नंतर भारतीय संघ नागपुरात ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. या मैदानावर टीम इंडियाने गेल्या वेळी कांगारू संघाचा पराभव केला होता, असेही रोहितने सांगितले.
आक्रमक खेळावर रोहित काय म्हणाला : आमचे लक्ष फलंदाजीदरम्यान स्ट्राईक रोटेट करण्यावर असेल. कधी-कधी परिस्थितीनुसार तुम्हाला आक्रमकपणे खेळण्याची आवश्यकता असते. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभूत करणे आव्हानात्मक असणार आहे.

पॅट कमिन्स म्हणाला मोठी धावसंख्या उभी करू : भारताचा दौरा आमच्यासाठी नेहमीच कठीण राहिलेला आहे. यावेळीसुद्धा आव्हाने कमी नाहीत. भारत विरुद्ध आम्हाला जिंकण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. भारतात खेळण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. भारता विरुद्ध खेळताना पहिल्या डावात आघाडी मिळवणं फार महत्त्वाचे असल्याने स्कोर बोर्डवर मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं ऑस्ट्रेलियन खेळाडू पॅट कमिन्सने नागपूर कसोटीपूर्वी पत्रकार परिषदेत म्हणाला आहे. नागपूरची खेळपट्टी नेहमीचं कठीण राहिलेली आहे. मात्र, आमचे खेळाडू यावर चांगला खेळ करेल असंही पॅट कमिन्स म्हणाले आहेत.

पाच वर्षानंतर कसोटी : नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर तब्बल पाच वर्षांनंतर कसोटी सामना होत असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. जामठा स्टेडियमवर शेवटचा कसोटी सामना नोव्हेंबर २०१७ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला होता. ऑस्ट्रेलियाचा संघ १४ वर्षांनंतर नागपुरात कसोटी सामना खेळणार आहे. यापूर्वी २००८ मध्ये या नव्या स्टेडियमवरील पहिलाच कसोटी सामना खेळला गेला होता, ज्यात भारताने कांगारूंचा १७२ धावांनी धुव्वा उडवून चार सामन्यांची मालिका २-० ने जिंकली होती.

असा आहे कसोटी सामन्याचा शेड्युल : बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी मालिकेतील पहिली कसोटी ९ ते १३ फेब्रुवारीदरम्यान जामठा स्टेडियमवर रंगणार आहे. तर दुसरी कसोटी दिल्ली येथे, तिसरी कसोटी धर्मशाला येथे, तर चौथी व शेवटची कसोटी लढत अहमदाबाद येथे खेळली जाणार आहे. भारतीय क्रिकेट संघ सुमारे आठ दिवसांपूर्वीच नागपुरात दाखल झालेला आहे. पाच दिवसांचा कसोटी सामना केल्यानंतर १४ फेब्रुवारीला दोन्ही संघ दिल्ली करिता रवाना होती.

बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेटमधील महान खेळाडू : ऑस्ट्रेलियाचे अॅलन बॉर्डर आणि भारताचे सुनील गावस्कर यांच्या नावाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू झाली. बॉर्डर आणि गावस्कर हे कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिले दोन क्रिकेटपटू आहेत. ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 10,000 पेक्षा जास्त कसोटी धावा केल्या. सचिन तेंडुलकर (३२६२), रिकी पाँटिंग (२५५५) आणि व्हीव्हीएस लक्ष्मण (२४३४) या ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारे तीन खेळाडू आहेत.

व्हीसीएचे आउटफिल्ड खूप वेगवान : लाल मातीपासून बनलेल्या गावस्कर करंडक स्पर्धेसाठी नागपूर सज्ज आहे. ही खेळपट्टी लाल मातीची बनलेला असल्यामुळे येथील खेळपट्टीवर चेंडूला भरपूर बाउंस मिळतो. त्यामुळे वेगवान गोलंदाजांसाठी ते फायदेशीर आहे. या खेळपट्टीवर विकेटच्या बाउंन्समुळे फलंदाजी करणेही सोपे आहे. बाउंसमुळे चेंडू थेट बॅटवर येतो. व्हीसीएचे आउटफिल्ड खूप वेगवान आहे. याचा फायदा फलंदाजांना मिळू शकतो. जसजसा सामना पुढे सरकतो तसतशी खेळपट्टी संत होत जाते.