ETV Bharat / state

नागपूर महानगरपालिकेकडून कोरोना रूग्णांच्या खाटात वाढ; आयुक्त व महापौरांच्या प्रयत्नाना यश

गंभीर लक्षणे असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध व्हावे यासाठी महापौर संदीप जोशी आणि आयुक्त राधाकृष्ण बी. यांच्यामार्फत काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. याच पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेच्या प्रयत्नातून आता खासगी ‍आणि शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांकरिता खाटांची उपलब्धता केली जात आहे. खासगी रुग्णालयांमध्ये ५८० तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये २४० बेड्स उपलब्ध झाल्याचे दिसून आले.

महापौर संदीप जोशी
महापौर संदीप जोशी
author img

By

Published : Sep 29, 2020, 10:50 PM IST

नागपूर - वाढती कोरोना रूग्णसंख्या पाहता अनेक ठिकाणी खाटा उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. नागपूरातही अशीच काहीशी परिस्थिती पहायला मिळत होती. मात्र नागपूर महानगरपालिकेकडून आता वाढीव खाटाच्या सुविधेमुळे रूग्णांना वेळेवर खाटा उपलब्ध होत असल्याते पहायला मिळत आहे. यात खाजगी व शासकीय रूग्णालयांतील खाटांमध्ये वाढ करण्यात आली आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी व महापौर संदिप जोशी यांच्या प्रयत्नामुळे ही वाढ करण्यात आली आहे.

गंभीर लक्षणे असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध व्हावे यासाठी महापौर संदीप जोशी आणि आयुक्त राधाकृष्ण बी. यांच्या मार्फत काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. याच पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेच्या प्रयत्नातून आता खासगी ‍आणि शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांकरिता खाटांची उपलब्धता केली जात आहे. खासगी रुग्णालयांमध्ये ५८० तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये २४० बेड्स उपलब्ध झाल्याचे दिसून आले. त्यामुळे कोव्हिड -१९ च्या रुग्णांना यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.

काही दिवासांपूर्वीच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली होती. या समितीमध्ये विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त, आय.एम.ए.चे अध्यक्ष, खाजगी रुग्णालयाचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. या समितीच्या माध्यमाने खाजगी रुग्णालयांची सुनावणी घेण्यात आली आणि त्यांनी सुद्धा प्रशासनाला सहकार्य करीत आपली तयारी दर्शविली. त्याचे फलित म्हणून कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी खाटा उपलब्ध होत आहे.

सध्या दररोज ५ हजारच्या वर नागरिकांची चाचणी केली जात असल्याचे मनपा कडून सांगितल्या जात आहे. शिवाय चाचणीसाठी ५० चाचणी केंद्र सुरु केले आहेत. तसेच १० मोबाईल सेंटरच्या माध्यमातून चाचणी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून हायरिक्स कान्टॅक्ट, रेड लिस्ट कान्टॅक्ट तसेच घरी राहणा-या ज्येष्ठ नागरिक ज्यांना मधुमेह, बी.पी. सारखे आजार आहे, त्यांची चाचणी केली जात आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची ओळख करणे सोपे होत आहे. शिवाय मनपाकडून वारंवार पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना आपली चाचणी करून घेण्याचे आवाहन केले जात आहे. सोबतच मनपा आयुक्तांकडूनही नागरिकांना आवाहन केले जात आहे, की जर कोणाच्याही घरी किंवा इमारतीमध्ये किंवा राहत असलेल्या माळ्यावर पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास त्यांचा संपर्कात आलेल्या नागरिकांनी आपली नि: शुल्क कोव्हिड-१९ चाचणी करून घेतली पाहिजे. चाचणी करण्यास कोणी टाळाटाळ करीत असेल तर मनपाला कडक भूमिका घ्यावी लागेल, असेही मनपा आयुक्तांचे निर्देश आहेत. त्यामुळे आता कोरोनाबाधित रूग्ण आढळला तरीही देखील त्याला वेळेवर खाट उपलब्ध होईल, अशी व्यवस्था मनपाकडून करण्यात आली आहे. या वाढीव खाटांमुळे नागरिकांची गैरसोय टाळता येईल अशी माहिती मनपा कडून देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.