नागपूर - हिंगणा परिसरातील डान्सबारचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. जिल्ह्यात एकाही डान्सबारला परवानगी नसताना राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिकाऱ्यांच्या नाकाखाली हे डान्सबार सुरू आहेत. याकडे प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
मोह आणि देशी दारूवर करवाई करण्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग मग्न असून सर्रासपणे चालणाऱ्या डान्सबारकडे कानाडोळा केला जात आहे. या व्हायरल व्हिडिओत लोक पैसे उधळताना आणि अश्लील नाचगाणे करतान दिसत आहेत.
डान्स बारमध्ये बारबालांना टीप देता येणार असली तरी त्यांच्यावर पैसे उडवण्यावर बंदी आहे. तसेच बारबालांच्या अश्लील डान्सवर बंदी असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मात्र हे सगळे नियम धाब्यावर बसवून डान्सबार चालू आहेत.