नागपूर - गरिबांसाठी बांधून ठेवलेले घरकुल वाटप न झाल्याने त्याचा उपयोग अवैध दारू साठवण्यासाठी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात नगर पालिकेने उभारलेल्या घरकुलात 435 लिटर मोहा दारू जप्त करण्यात आली. राज्य उत्तपादन शुल्क विभागाने कारवाई केली असून यात मात्र स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन आहे. पोलीस स्टेशनपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर हे घरकुल आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला दुधाळा रोडवर नगरपालिकेच्या वापरात नसलेल्या घरकुलाचा उपयोग दारूच्या अवैध धंद्याकरिता केला आहे. त्यानंतर प्रत्यक्ष जाऊन छापा टाकला असताना 435 लिटर मोहाची दारू मिळून आली. दारू निर्मितीच्या साहित्यासह 38 हजार 495 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई दारुबंदी कायद्याचे कलम 65 इ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यात सुनील चोखी यादव या आरोपीस अटक करण्यात आली आहे.

घरकुल बांधून काळ लोटला पण वाटप झाले नाही -
रामटेक नगरपालिकेने रामटेक शहराच्यालगत दुधाळा रोडवर 72 घरकुल बांधण्यात आले. पण अद्यापही गरजुंना घरकुलांचे वाटप झालेले नाही. त्यामुळे घरकुलांचा उपयोग गुन्हेगारांनी दारु, जुगार व अन्य असामाजिक कार्यासाठी वापर केला जात असल्याचेही पुढे येत आहे. तसेच ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या बॉटल सहज फेकल्या जाते. मात्र याच रिकाम्या बॉटलमध्ये अवैध दारु भरलेल्या मिळून आल्यात. यामुळे जप्ती नंतर ही दारू नष्ट करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त मोहन वर्दे, नागपूर जिल्ह्याचे अधीक्षक सोनोने, पारशिवनी विभागाचे उत्पादन शुल्क निरीक्षक थोरात यांच्या मार्गदर्शनात दुय्यम निरीक्षक अनिल जुमडे, शिपाई मिलिंद गाय गवळी व चालक सुभाष शिंदे यांनी ही कारवाई पार पाडली.
