नागपूर - अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणाची तपासणी सीबीआय करत आहे. मात्र, सुमारे पाच महिने उलटले तरीही सीबीआयने सुशांतसिंहने आत्महत्या केली होती की त्याचा खून झाला होता हे स्पष्ट केले नाही. महाराष्ट्रासह विविध राज्यातील जनतेला या प्रकरणाबाबत जाणून घ्यायचे आहे. त्यामुळे सीबीआयने लवकरात लवकर या प्रकरणाबाबत जनतेसमोर खुलासा करावा, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. ते नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
काय आहे सुशांतसिंह प्रकरण..?
अभिनेता सुशांतसिंह राजपूतने 14 जून, 2020 रोजी आत्महत्या केली. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या घरात त्याने गळफास घेतला होता. त्याच्या मृत्यूनंतर मात्र उलटसुलट चर्चांचे पेव फुटले होते. अनेकांनी सुशांतच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला होता. त्याचबरोबर हत्या असल्याचेही अनेकांनी म्हटले होते. या प्रकरणाची सुरूवातीला मुंबई पोलीस चौकशी करत होते. मात्र, नंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. मात्र, अद्यापही सुशांतच्या मृत्यूचे गुढ अद्यापही उलगडलेले नाही.
हेही वाचा - नागपूर महामेट्रोचा रविवार स्पेशल.. प्रवाश्यांसाठी खाणे-गाण्यासह, शॉपिंगची मेजवानी
हेही वाचा - नागपुरात महिलेचा जळून मृत्यू; आत्महत्या की हत्या याबाबत तपास सुरू