ETV Bharat / state

'सुशांतची हत्या की, आत्महत्या; आमच्याकडे अद्याप अधिकृत माहिती नाही' - एम्स अहवाल सुशांतसिंह

सुशांतसिंह राजपूतची हत्या नसून त्याने आत्महत्या केली असल्याचा अहवाल 'एम्स'कडून पुढे आला आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडे कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

नागपूर
नागपूर
author img

By

Published : Oct 3, 2020, 3:12 PM IST

Updated : Oct 3, 2020, 3:24 PM IST

नागपूर - अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली की, त्याची हत्या झाली या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत केला जात आहे. त्यामुळे सध्या या तपासातून काय निष्पन्न झाले या बाबतीत अजून अधिकृत माहिती आम्हाला मिळालेली नाही, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. ते नागपुरात बोलत होते.

माहिती देताना मंत्री

सुशांतसिंह राजपूतची हत्या झाली नसून त्याने आत्महत्या केली असल्याचा अहवाल 'एम्स'कडून पुढे आला आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडे कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. ती माहिती मिळाल्यास त्यावर वक्तव्य करणे उपयुक्त ठरेल, मात्र सीबीआयने या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करून सत्य देशासमोर मांडण्याची गरज असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

हेही वाचा - उत्तरप्रदेशमध्ये जंगल राज; गृहमंत्री अनिल देशमुख यांची टीका

Last Updated : Oct 3, 2020, 3:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.