नागपूर - लग्न करण्यापूर्वी स्वतःकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असावी या हेतूने चोरीच्या क्षेत्रात आपले करिअर घडवू पाहणाऱ्या एका उच्चशिक्षित तरुणीला नागपूरच्या तहसील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. पौर्णिमा उर्फ पिंकी वासुदेव कामडे (वय २५), असे या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी तिच्याकडून तब्बल २१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पौर्णिमा उर्फ पिंकी कामडेने एमएडपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणारी ही तरुणी गेल्या 4 वर्षांपासून महिलांच्या पर्ससह दागिने लंपास करत होती. मात्र, या काळात ती कधीही पोलिसांच्या हाती लागली नाही.
हेही वाचा - 'वीज दरवाढीचा परिणाम सामान्य नागरिकांवर पडणार नाही'
सुमारे ८ दिवसांपूर्वी पौर्णिमा उर्फ पिंकीला तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराफा बाजार परिसरात चोरी करताना लोकांनीच रंगेहात पकडले होते. मात्र, ती पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी तिला अटक केली. पिंकीला पोलीस ठाण्यात आणून तिची चौकशी करण्यात आली. तेव्हा तिने नागपूर शहरात आणि जिल्ह्यात तब्बल १४ पेक्षा जास्त चोऱ्या केल्याची कबुली दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतली. या कारवाईत ६०९ ग्राम सोन्याचे दागिने, १४२१ ग्राम सोन्याचे दागिन्यांसह २१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा - नागपूर पोलिसांकडून हटके ट्विट.. मकरसंक्रांतीच्या भन्नाट शुभेच्छा