नागपूर - शहरात आज 47.5 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवण्यात आले आहे. मे महिना संपत आला असला तरी उन्हाचा कडाका काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलट दररोज तापमान वाढतच आहे.
विदर्भात उन्हाळ्यात तापमान दरवर्षीच जास्त असते. त्यामध्ये दरवर्षी वाढ होत आहे. त्यामुळे शहरात उष्माघाताचे प्रमाण वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे. तर ग्लोबल वार्मिंग आणि ग्रीन हाऊस गॅसेसमुळे तापमान वाढत आहे. नागरिकांनी या काळात काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.