ETV Bharat / state

शरद पवारांच्या घरावरील हल्ला निंदनीय, राज्य सरकार यापुढे काळजी घेईल - राज्यपाल कोश्यारी - गारगोटी संग्रहालय भेट राज्यपाल कोश्यारी

शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला निंदनीय आहे. भविष्यात अशा घटना घडू नये, यासाठी सरकार काळजी घेईल, अशी प्रतिक्रिया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली. सिन्नर येथील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील गारगोटी संग्रहालयास भेट देण्यासाठी ते आले होते.

protest at Sharad Pawar house Koshyari comment
गारगोटी संग्रहालय भेट राज्यपाल कोश्यारी
author img

By

Published : Apr 10, 2022, 10:16 AM IST

नाशिक - शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला निंदनीय आहे. भविष्यात अशा घटना घडू नये, यासाठी सरकार काळजी घेईल, अशी प्रतिक्रिया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली. सिन्नर येथील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील गारगोटी संग्रहालयास भेट देण्यासाठी ते आले होते. यावेळी प्रसारमाध्यमाना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

प्रतिक्रिया देताना राज्यपाल कोश्यारी

हेही वाचा - Chhagan Bhujbal on Silver Oak Attack : कर्मचाऱ्यांना भडकवणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी - मंत्री छगन भुजबळ

एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याबद्दल प्रश्न विचारताच कोश्यारी यांनी मुख्यमंत्री हे प्रकरण हाताळत असून, ते समजदार व्यक्ती आहेत. शरद पवार स्वतः प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, त्यामुळे या हल्ल्याचे कोणीही समर्थन करणार नाही, असे म्हटले. 8 एप्रिलला दुपारी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले होते. यावेळी जमाव आक्रमक होऊन पवार यांच्या घरावर दगड, चप्पल फेकही केली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते आणि इतर 109 एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली होती. न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर इतर कर्मचाऱ्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला प्रकरणात DCP योगेश कुमार (Mumbai DCP Yogesh Kumar) यांची बदली करण्यात आली आहे. निवासस्थानावर हल्ला झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी झोन- 2 चे DCP योगेश कुमार यांना त्यांच्या तात्पुरत्या पदावरून हटवण्यात आले आहे. नीलोत्पल यांना झोन II चा पदभार देण्यात आला आहे. मुंबई पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी ही कारवाई केली आहे.

डीसीपी योगेश कुमार यांची बदली - एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर आंदोलन केले होते. त्यानंतर आता मुंबईचे डीसीपी योगेश कुमार यांची तात्पुरती उचलबांगडी करण्यात आली आहे. गृहमंत्री वळसे पाटील आणि मुंबई पोलीस आयुक्तांमध्ये बैठक झाली. त्यानंतर डीसीपी योगेश कुमार यांची बदली करण्यात आली आहे.

हेही वाचा - Satana Murder case : घरी आल्याने खून; सटाण्यातील खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.