नागपूर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांच्या विधानाचा खुलासा केला (Governor Bhagat Singh Koshyari Offensive statement ) आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा प्रतिक्रिया देणे मला योग्य वाटत नाही. राज्यपालांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माझ्या मनात अपार आधार आहे. माझ्या त्या भाषणाचे कोणी चुकीचे अर्थ काढू नये. एवढे स्पष्ट राज्यपाल बोलल्यानंतर पुन्हा पुन्हा त्यावर चर्चा प्रतिक्रिया योग्य ( Governor Clear role regarding Chhatrapati Shivaji Maharaj )नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीची भावना आहे. जोवर सूर्य चंद्र आहे पृथ्वी आहे तोवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आमच्यासाठी प्रेरणादायी असणार असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत, ते नागपूर विमानतळावर पत्रकारांसोबत बोलत (Forest Minister Sudhir Mungantiwar in Nagpur ) होते.
प्रत्येक राज्याला महाराष्ट्रात काम पडते : महाराष्ट्राला तिरुपतीमध्ये जागा मिळाली आहे. तिरूपतीच्या ट्रस्टमध्ये जागा मिळाली आहे. उद्धव ठाकरेंचे सचिव मिलिंद नार्वेकर ट्रस्टमध्ये आहेत. महाराष्ट्रला दिल्लीत महाराष्ट्र सदनच्या स्वरूपात जागा मिळाली आहे. आपण जागा मागितली तर तर कुठल्याही राज्यात आपल्याला जागा मिळेल, मात्र जागा मागितलीच नसेल तर त्या राज्यामध्ये राज्य कशी मिळेल. मुंबई आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे इतर सर्व राज्य इथे जागा मागतात. प्रत्येक राज्यात महाराष्ट्र सदन बांधायची यामुळे गरज पडत नाही, कारण महाराष्ट्र प्रगत राज्य महाराष्ट्रातील लोकांना इतर राज्यात तेवढं काम पडत नाही. मात्र प्रत्येक राज्याला महाराष्ट्रात काम पडतं.
जनाची नाही तर मनाची लाज ठेवा : जुने ऑडिओ ऐकून जर जनाची नाही आणि मनाची लाज ठेवायची असेल, तर शरद पवारपासून उद्धव ठाकरेपर्यंत सर्वांचे जुने व्हिडिओ काढू आणि सर्वपक्षीय जनाची नाही तर मनाची लाज ठेवावी असा सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून कार्यक्रम ठेवू. तुम्हीच जाऊन बांधावर जाऊन सांगितले होते पन्नास हजारांची मदत देऊ, कुठे गेली ती मदत. तुम्ही सांगितले होते आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत कधी संबंध ठेवणार नाही, तुमचाच व्हिडिओ आहे, मग कोणी जनाची नाही तर मनाची ठेवावी. छगन भुजबळबद्दल तुम्ही काय म्हणायचे. तुम्ही श्री राम आणि श्रीकृष्णाला शिव्या देणाऱ्यांसोबत गेले. जनता निवडणुकीत लाज काढतेच. तर वाट पाहू जनता कोणाची लाज काढते.
शिवसेना गटार आहे का : उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याकडे खूप गंभीरतेने बघू नये. शिवसेनेतील नेत्यांना ते गटारातील किडे म्हणतात. मात्र ते आधी शिवसेनेचे होते ना. शिवसेना काही गटार आहे का. अब्दुल सत्तारांना तुम्हीच प्रवेश दिला होता. तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आधार घेऊन ते बाहेर पडले तर ते वाईट.
उद्धव ठाकरे अयोध्येला गेले तर चालते : मुख्यमंत्री आणि आमदार गुवाहाटी दौऱ्यावर गेले आहेत. देवीच न्याय करत असते आपण पाहिलेच आहे,की आजवर काय काय झालं आहे आणि पुढेही आपण पाहूच जो जैसा करेगा तो वैसा भरेगा. उद्धव ठाकरे अयोध्येच्या राम मंदिरात गेले तर ते चालते. मात्र शिंदे गट कामाख्या देवीच्या मंदिरात गेले तर ते दुसऱ्या राज्याचे मंदिर झाले असं कसं.