नागपूर - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप कमी होत असताना पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. नागपुरातील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणी संग्रहालयात मंगळवारपासून जंगल सफारीला सुरुवात झाली आहे. गोरेवाडा प्राणी उद्यान राज्यात कोरोनानंतर सुरू होणारे पहिले प्राणीसंग्रहालय आहे. यामुळे पहिल्याच दिवशी पर्यटकांनी प्राणीसंग्रहालयाला भेट दिली. शहराबरोबरच जिल्ह्याभरातून पर्यटक येऊ लागले आहे.
तीन महिन्यांनंतर पर्यटन सुरूनागपूर शहरापासून काही अंतरावर असलेले हे प्राणीउद्यान वन्य प्रेमी आणि जंगल सफारी करणाऱ्यांसाठी मेजवानी ठरत आहे. यात 26 जानेवारीला मुख्यमंत्री यांच्या हस्ते उदघाटन झाले होते. दुसऱ्या लाटेत जवळपास तीन महिने बंद असलेले गोरेवाड प्राणी उद्यान पर्यटकांसाठी पुन्हा खुले झाले आहे.
पहिल्याच दिवशी वाघ, अस्वल आणि बिबट्याचे दर्शन
पहिल्याच दिवशी आलेल्या पर्यटकांना 4 बिबट्या आपापसात खेळताना, 6 अस्वल, राजेशाही बैठकीत असलेला राजकुमार वाघ, नीलगाय आणि चितळ, यासोबत काही पक्षीही पाहायला मिळाले. येथे 135 हेक्टर क्षेत्रफळात जंगलाप्रमाणे उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. जेणेकरून वन्य प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात राहता येईल. आणि नागरिकांनासुद्धा जंगल सफारीची मजा घेता येईल. याठिकाणी वेग वेगळे प्राण्यांना पिंजऱ्यात ठेवण्यात आले आले. यामध्ये वाघ, अस्वल आणि, बिबट या प्राण्यांसाठी 25 हेक्टर पिंजरा तयार करण्यात आला आहे. हरणासाठीचा पिंजरा 45 हेक्टर क्षेत्रफळावर आहे. यासोबत पर्यटनासाठी बंद बसमधून काचेतून वन्य प्राणी पाहण्याचा आनंद लुटता येतो. यासोबत कोरोनाच्या काळात प्राण्यांचीही विशेष काळजी घेतली जात असल्याचे गोरेवाड्याचे अभिरक्षण दीपक सावंत यांनी सांगितले.
मोठ्यांसोबत लहाग्यांनी लुटला आनंद मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या भीतीने लहान मुलांना घराबाहेर फिरणे बंद आहे. यासोबत शाळा बंद असल्याने घराच्या चार भिंतीत कोंडल्यादत मुलांची अवस्था झाली आहे. यामुळे आज कुटुंबासोबत आलेल्या लहान मुलांनी जंगल सफारीचा आनंद लुटला.लॉकडाऊनमध्ये रिकाम्या बसेसप्राण्यांना पर्यटन काळात बसेस फिरत राहणार असल्याने त्यांची सवय तुटू नये. तसेच त्यांना वाहनांची सवय असावी म्हणून रिकाम्या बसेस फिरवण्यात आल्याचेही येथील अधिकाऱ्यांना सांगितले.ऑनलाइन बुकींगनागपूर शहराचा पॉझिटिव्ह रेट हा 0.80 असून लेव्हल एक मध्ये असल्याने शिथिलता मिळाली आहे. यामुळेच पर्यटन खुले करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. पण असे असले तरी कोरोनाच्या नियमाचे पालन करून, नागरिकांना मास्क बंधनकारक, तसेच थर्मलने तापमान मोजून बसमध्ये प्रवेश दिला जातो. या सगळ्यात 20 बसेस रोज सोडल्या जात असून सध्या पन्नास टक्के म्हणजे 10 बसेस अर्धा तासाच्या अंतराने सोडल्या जात आहे. पहिल्याच दिवशी जवळपास 200 च्या घरात पर्यटकानी सफारीचा आनंद घेतला आहे. यात ऑनलाइन बुकिंग असल्याने नागरिकांना घरी बसूनच बुकिंग करण्याचे आवाहन केले जात आहे. हेही वाचा - शासकीय अधिकार द्या; 3 महिन्यात ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्वरत करून देऊ - संजय कूटे