ETV Bharat / state

G20 Meeting In Nagpur : नागपुरात मार्चमध्ये G-20 देशाच्या प्रतिनिधींची बैठक; महत्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा - जी 20 समूह देश

नागपूर येथे येत्या 21 आणि 22 मार्च रोजी होणाऱ्या जी- 20 गटाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जी - 20 समूहातील देशातील सिव्हिल सोसायटीचे सदस्य सहभागी होणार आहेत. जी- 20 मध्ये सहभागी असणारे देश आणि तेथील विविध शिष्टमंडळ वेगवेगळ्या १२ मुद्यांवर भारतातील विविध शहरांमध्ये बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे.

G20 Meeting In Nagpur
जी 20 परिषद बैठक
author img

By

Published : Feb 10, 2023, 7:26 PM IST

नागपूर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी माहिती देताना

नागपूर : शहरात येथे येत्या 21 आणि 22 मार्च रोजी होणाऱ्या जी- 20 गटाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. जी- 20 बैठकीत येणाऱ्या प्रतिनिधी सदस्यांना संत्रानगरी नागपूरचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दर्शन घडवण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिके कडून सुरू झाले आहेत. या अनुषंगाने सतत बैठका सुरू झालेल्या आहेत. संत्रानगरीला ‘टायगर कॅपिटल ऑफ इंडिया’ म्हणून जगापुढे यावे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

50 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध : 1 मार्चपासून यासंदर्भातील नियोजित कामे पूर्ण करण्याचे व त्यानंतर पाहुण्यांचे आगमन होईपर्यंत शहर सजविण्याच्या आवाहन करण्यात आले आहे. या आयोजनाच्या माध्यमातून नागपूरचा चेहरा मोहरा बदलला जाणार आहे. त्याकरिता शासनाने 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. नागपूर महापालिकेकडून आणखी 122 कोटींचा निधीची मागणी करण्यात आली, असल्याची माहिती मनपाचे आयुक्त राधाकृष्णन बी यांनी दिली आहे.

सिव्हिल सोसायटीची बैठक नागपूरात : एका वर्षाच्या कालावधीमध्ये या बैठका होत आहेत. जी-20 चे यजमानपद भारताला मिळाल्यानंतर या बैठकीची सुरुवात झाली. नागपूर येथे होणारी जी-20 ही सिव्हिल सोसायटीच्या संदर्भात जागतिक स्तरावरील ध्येयधोरण ठरवणार आहे. त्यामुळे जी-20 बैठकीला सी-20 असे देखील म्हटले जाते. मुंबई येथे यापूर्वी झालेली बैठक ही व्यापारांची बैठक होती. तर पुणे येथे नुकतीच झालेली बैठक ही अर्बन 20 या संदर्भातील होती. अंतिम बैठक ही 30 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. या अंतिम बैठकीला जी -२० समूहातील प्रत्येक देशाचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा दौरा : नागपूरच्या विविध संस्कृतींचे दर्शन जी-20 च्या प्रतिनिधींना करवून दिले जाणार आहे. जी 20 परिषदेदरम्यान शहराचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा पुढे आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नागपुरच्या पर्यटन स्थळांमध्ये दीक्षाभूमी, पेंच राष्ट्रीय उद्यान, ड्रॅगन पॅलेस कामठी या प्रमुख स्थळांचे दर्शन घडविण्यात येणार आहे.

नागरी संस्थांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवूया : विविध सामाजिक समस्या, नागरी समस्या, पर्यावरण ते वन्यजीव संवर्धनासंदर्भात अनेक नागरिक संस्था देशात, विदर्भात समर्थपणे काम करत आहे. जगाच्या व्यासपीठावर भारतातील नागरी संस्थांच्या कर्तुत्वाचा ठसा उमटवण्याची संधी जी -20 आयोजनाच्या माध्यमातून मिळत आहे. या संधीचे सोने करूया, असे आवाहन भारतीय संस्कृती संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले.

हेही वाचा : G 20 Summit In Jodhpur : गिग प्लॅटफॉर्म कामगारांनाही पेन्शन सारख्या सुविधा मिळाल्या पाहिजेत - केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.