नागपूर - शहरातील भरतवन हे सर्वात जुने व सर्वाधिक लोकप्रीय उद्यान आहे. सध्या भरतवन ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयापर्यंत रस्ता तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामध्ये जवळपास १९८ झाडांची कत्तल करण्याचा निर्णय बांधकाम विभागातर्फे घेण्यात आला आहे. मात्र, ही वनसंपदा वाचविण्यासाठी नागपूरकरांनी पुढाकार घेतला आहे.
रस्ता निर्मिती करण्यासाठी जी वृक्षतोड केली जाणार आहे. त्यामध्ये अनेक औषधी वनस्पतींचा समावेश आहे. हे उद्यान सध्या वाचविण्यासाठी नागपूर येथील दोन समाजसेवी संस्था एकत्रिपणे आल्या आहेत. या दोन्ही संस्थांनी आज फुटाळा उद्यान संवर्धनासाठी तलावाभोवती मानवी साखळी तयार केली आहे.
मेट्रो प्रशासनाच्या वतीने तेलंगखेडी तलावाच्या मार्गावर अँपी थिएटर बाधण्यात येणार आहे. १९६० च्या दशकात ही जमीन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला संशोधनासाठी दिली होती. आणि आता दोनशे वर्ष्यापासून असलेली झाडे तोडल्या जाणार आहे. भरतवन वाचवा याच उद्देशाने नागपुरातील संघटना एकत्र येऊन त्यांनी फुटाळा तलावाभोवती मानवी साखळी केली.