नागपूर - गेल्या 24 तासात शहर पोलीस दलातील चार कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे येथील कोरोनाने मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या एकूण 10 वर पोहोचली आहे. सध्या नागपूरातील 742 पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातच रविवारी चार पोलीस कर्मचारी कोरोनामुळे दगावल्याने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे
संपूर्ण नागपूर जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. प्रत्येक नागरिकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. त्यातच नागपूर शहर पोलीस दलात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने असल्याने कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढतच आहे. तर मृतांचा आकडाही वाढत आहे. गेल्या 24 तासांत चार पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. त्यामुळे पोलीस दलातही भीती निर्माण झाली आहे.
दरम्यान, आज (रविवारी) ज्या पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला त्यात सक्करदरा पोलीस ठाणे, पोलीस मुख्यालयातील एक महिला पोलीस हवालदार, गणेशपेठ पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार आणि आणखी एक सहायक फौजदार यांचा समावेश आहे.
हेही वाचा - पुण्यात कार्डिअॅक रुग्णवाहिकांची कमतरता, रुग्णांचे जीव धोक्यात