ETV Bharat / state

नागपुरात ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, १५ ते २० जण जखमी - 7 injured

जिल्ह्यातील कुही परिसरात ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला असून १५ ते २० जण जखमी झाले आहेत. जखमींचा ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघा
author img

By

Published : Jul 8, 2019, 8:01 AM IST

Updated : Jul 8, 2019, 9:57 AM IST

नागपूर - जिल्ह्यातील कुही परिसरात ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला असून १५ ते २० जण जखमी झाले आहेत. जखमींवर ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात

महालक्ष्मी ट्रॅव्हल्स गडचिरोलीच्या वडसेवरून नागपूरच्या दिशेने जात होती. यावेळी हा अपघात झाला. ट्रव्हल्सने रेतीच्या उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला तर १५ ते २० जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रात्री उशिरा घडल्याने पोलिसांना मदतकार्य करण्यात अनेक अडचणी आल्या. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी ट्रॅव्हल्समध्ये ४० च्या आसपास प्रवासी होते. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला आहे तर १५ ते २० जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. मृतांमध्ये नागपूरच्या दिघोरी येथील राहणारे अनिल कवटे, प्रमिला कवटे आणि ट्रॅव्हल्सच्या चालक कार्तिक डोंगल यांच्यासह सोनू नावाच्या तरुणाचा मृतात समावेश असल्याचे समोर आले आहे.

Intro:नागपूर

ट्रॅव्हल्स- ट्रक चा भिषण अपघात; 4 ठार तर ७ गंभीर

नागपूर जिल्ह्यातील कुही परिसरात भीषण अपघात झाल्याची घटना पुढे आलीय काल रात्री ९ वाजताच्या सुमारास हा अपघात झालाय नागपूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने रेतीच्या उभ्या ट्रकला जोरदार दिली धडक दिली. कुही फाट्या जवळ हा अपघात झालाय. Body:महालक्षमही ट्रॅव्हक्स गडचिरोली च्या वडसे वरून नागपूर च्या दिशेने येत असताना सदर अपघात झालाय. या अपघातात चार जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे तसचे सात जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींचा ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
Conclusion:
Last Updated : Jul 8, 2019, 9:57 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.