ETV Bharat / state

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे सर्वपक्षीय षडयंत्र - प्रकाश जाधव - nagpur shiv sena

तीन दिवसांपूर्वी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रविणीश पांडे उर्फ चिंटू महाराजसह त्यांच्या 4 कार्यकर्त्यांवर रेती व्यावसायिकाकडून एक लाखांची खंडणी मगितल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या पार्श्वभूमीवर नागपूरचे शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली.

माजी खासदार प्रकाश जाधव
author img

By

Published : Aug 31, 2019, 2:45 PM IST

नागपूर - पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने हक्क सांगितल्यामुळेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप माजी खासदार प्रकाश जाधव यांनी केला आहे. या षडयंत्रात सर्वच राजकीय पक्षांचा सहभाग असल्याचे सांगत त्यांनी नाव न घेता भाजपवर आरोप केला आहे.

नागपूरचे शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली.

तीन दिवसांपूर्वी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रविणीश पांडे उर्फ चिंटू महाराजसह त्यांच्या 4 कार्यकर्त्यांवर रेती व्यावसायिकाकडून एक लाखांची खंडणी मगितल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर शिवसेनेचे नेते प्रकाश जाधव चिंटू महाराजांच्या बचावासाठी पुढे आले आहेत.

हेही वाचा - नागपूरच्या सहा जागांसाठी ८० इच्छुक; पालकमंत्री बावनकुळेंचे विद्यमान आमदारांवर सूचक वक्तव्य

पूर्व नागपूर विधानसभेची जागा मागितली म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप माजी खासदार प्रकाश जाधव यांनी केला आहे. त्यांनी नाव न घेता भाजपवर आरोपांची सरबत्ती केली आहे. खंडणी प्रकरणात पोलिसांकडे कोणतेही पुरावे नसताना पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची घाई कुणाच्या इशाऱयावरून केली याची पूर्ण माहिती त्यांच्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत नागपुरात भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

या संपूर्ण प्रकरणात शिवसेना पोलिसांच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार आल्याचे देखील ते म्हणाले आहेत. राजकीय आशिर्वादाने नागपुरात रेती तस्करीचा गोरखधंदा सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा - देशातील 400 रेल्वे स्थानकांवर मिळणार 'कुल्हड' चहा - नितीन गडकरी

Intro:पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने हक्क सांगितल्या मुळेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना खोट्या-नाट्या गुन्ह्यात अडकवण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप माजी खासदार प्रकाश जाधव यांनी केलाय....या षडयंत्रात सर्वच राजकीय पक्षाच्या सहभाग असल्याचे सांगत त्यांनी नाव न घेता भाजपवर आरोप केलाय
Body:तीन दिवसांपूर्वी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रविणीश पांडे उर्फ चिंटू महाराज सह त्यांच्या 4 कार्यकर्त्यावर रेती व्यावसायिका कडून एक लाखांची खंडणी मगितल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेनेचे नेते प्रकाश जाधव चिंटू महाराजांच्या बचावाचा पुढे आले आहे....पूर्व नागपूर विधानसभेची जागा मागीतली म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा खुलासा माजी खासदार प्रकाश जाधव यांनी केलाय..त्यांनी नाव न घेता भाजपवर आरोपांची सरबत्ती केली आहे...खंडणी प्रकरणात पोलिसांकडे कोणतेही पुरावे नसताना पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची घाई कुणाच्या इशार्यावरून याची पूर्ण माहिती त्यांच्या कडे असल्याचे त्यांनी सांगितले...या संपूर्ण प्रकरणात शिवसेना पोलीसांच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार आल्याचे देखील ते म्हणाले आहेत...राजकीय आशिर्वादाने नागपुरात रेती तष्करीचा गोरखधंदा सुरू असल्याचा आरोप केलाय

बाईट- प्रकाश जाधव, जिल्हा प्रमुख, शिवसेना, नागपूर

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.