नागपूर - माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार यांना न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांना 14 हजारांचा दंड ही ठोठावला आहे. त्यांना २०१७ सालीच्या घटनेत ही शिक्षा झाली आहे. सुनील केदार यांनी आंदोलनात महावितरणच्या अधिकाऱ्यांना मारहाण केली होती. त्या प्रकरणात न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने सुनील केदार यांच्यासह अन्य तिघांनाही शिक्षा सुनावली.
काय आहे प्रकरण : नागपूर जिल्ह्यातील तळेगाव येथील शेतकरी आणि महावितरणचे अधिकाऱ्यांमध्ये ट्रान्समिशन लाइन टाकण्यावरून वाद झाला होता. वाद मिटवण्यासाठी सुनील केदार त्यांच्या समर्थकांसह गावात गेले होते. त्यावेळी सुनील केदार यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना मारले असा आरोप अधिकाऱ्यांनी केला होता. या विरोधात महावितरण अधिकाऱ्यांनी केळवद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यावर आज न्यायालयाने १ वर्षाची शिक्षा आणि 14 हजारांचा दंड ठोठावला आहे.