ETV Bharat / state

Flag Hoisting In Ambazari Lake : सलग चौथ्या वर्षी दृष्टिहीन ईश्वरीसह टीमने केले अंबाझरी तलावाच्या मध्यभागी ध्वजारोहण

देशावर असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी याही वर्षी ईश्वरीने अंबाझरी तलावात तब्बल दोन किलोमीटर अंतर पोहून तलावाच्या मध्यभागी ध्वजारोहण करण्याची कामगिरी पार पडली. दृष्टिहीन 13 वर्षीय ईश्वरी पांडे या चिमुकलीने अंबाझरी तलावाच्या मध्यभागी जाऊन राष्ट्र ध्वज फडकावला आहे.

flag hoisting
ध्वजारोहण
author img

By

Published : Jan 26, 2023, 7:22 PM IST

दृष्टिहीन ईश्वरीसह टीमने केले अंबाझरी तलावाच्या मध्यभागी ध्वजारोहण

नागपूर : एका दृष्टीहीन चिमुकलीने आजचा प्रजासत्ताक दिवस अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे. ईश्वरी पांडे नामक दृष्टिहीन 13 वर्षीय चिमुकलीने अंबाझरी तलावाच्या मध्यभागी जाऊन राष्ट्र ध्वज फडकावला आहे. ईश्वरीला जन्मापासूनच दृष्टी नाही. आपल्या देशाचे सौंदर्य ईश्वरीने कधीही बघितले नाही. केवळ स्वातंत्र्य लढाईच्या कथा कहाण्या ऐकून ईश्वरीने आपल्या मनात आपला देश शूरवीरांचा आहे, हे चित्र रंगवले आहे. म्हणून ईश्वरीने पांडे या चिमुकलीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे.

अडीच तास पोहली ईश्वरी : आपला भारत जगातील सर्वात सुंदर देश आहे, असं कोणताही भारतीय गर्वाने सांगेल. जे जन्माने भारतीय आहेत आणि कर्माने सुद्धा भारतीय आहेत. त्यांच्याकरिता आजचा उत्सव किती महत्त्वाचा आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मात्र, ज्यांनी आपला देश कधीही आपल्या डोळ्यांनी बघितलाच नाही. त्यांच्यासाठी आजच्या ऐतिहासिक दिवसाचे महत्व किती असेल याचं उत्तर दिलं आहे, नागपुरच्या १२ वर्षीय या चिमुकलीने. तब्बल अडीच तास पोहून ईश्वरीन अंबाझरी तलावाच्या अगदी मध्यभागी असलेल्या खांबावर राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान मिळवला आहे.

नागपुरकरांनी केले ईश्वरीचे स्वागत : ईश्वरी पांडे या चिमुकलीने आज समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिलेला आहे. जगातील डोळस व्यक्तींना जे जमलं नाही ते या चिमुकलीने करून दाखवलं आहे. सकाळीच्या वेळी तापमान 10 अंश सेल्सिअस होत. त्यामुळे तलावातील पाणी प्रचंड गार होत. आशावेळी ईश्वरीन प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ही ऐतिहासिक कामगिरी पूर्ण केली आहे. ज्यावेळी ती परत आली तेव्हा तलावावर उपस्थित असलेल्या प्रत्येकाने ईश्वरीचे टाळ्या वाजवून स्वागत केले.

ईश्वरीचा संघर्ष हजारोंसाठी प्रेरणादायी : ईश्वरी ही कमलेश आणि अरुणा पांडे यांची कन्या आहे. ईश्वरीची आई अरुणा पांडे या सहा महिन्यांच्या गर्भवती असताना ईश्वरीचा जन्म झाला. त्यामुळे अंगाचा पूर्णपणे विकास झाला नव्हता. जन्माच्या वेळी ईश्वरीचे वजन हे केवळ 700 ग्राम इतकेच होते. म्हणूनच सुमारे अडीच महिने ती ऑक्सिजन'वर होती. त्यावेळी तिच्या डोळ्याचा रेटिना हा पुर्णपणे क्षतीग्रस्त झाला. त्यामुळे ती यापुढे कधीही हे सुंदर जग बघू शकणार नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं. कुटुंबीय तिच्या जगण्याची उमेद हरवून बसले होते. मात्र, हळु-हळु ईश्वरीने सर्व समस्यांवर मात केली. एखादा दैवी चमत्कार व्हावा असा प्रवास चिमुकलीचा सुरू झाला होता. त्यामुळे पांडे दाम्पत्याने तिचं नाव ईश्वरी ठेवलं होतं आणि ईश्वरीने देखील आपल्या नावाला साजेशी कामगिरी करून दाखवली आहे.

हेही वाचा - Devendra Fadvanis on Republic Day : प्रजासत्ताक दिनानिमित्ताने देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान; म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.