नागपूर - ५ कोटी लोकांना रोजगार देण्याचा माझ्या खात्यामार्फत प्रयत्न सुरू आहे. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी लघू उद्योग महत्वाचा वाटा उचलत असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. मी नियमाने चालणारा मंत्री नाही. जनतेच्या कामासाठी मी अधिकाऱ्यांचेसुद्धा मानत नसल्याचे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले आहे.
शहरात महिला उद्योजिका या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गडकरी यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर, जनतेसाठी काम करत राहणे हाच माझा उद्योग असल्याचे देखील ते म्हणाले. सहकार तत्वावर चालणाऱ्या अनेक संस्था भ्रष्टाचारामुळे अडचणीत येतात. पण, लिज्जत पापडमध्ये चांगले काम होत आहे. अशा हजारो संस्था उभ्या झाल्या पाहिजे जेणेकरून लाखो बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल. देशात लघू उद्योगात २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असल्याचे देखील गडकरी यांनी सांगितले.
हेही वाचा- नागपूर एअर फेस्ट २०१९ : वायुसेनेतील लढाऊ विमानांच्या चित्तथरारक कसरतींचे सादरीकरण