ETV Bharat / state

भंडारा दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत - आरोग्यमंत्री

भंडारा येथे घडलेल्या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.

राजेश टोपे
राजेश टोपे
author img

By

Published : Jan 9, 2021, 3:57 PM IST

Updated : Jan 9, 2021, 5:15 PM IST

नागपूर - रात्री दोन वाजण्याच्या सुमारास भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला आग लागल्याच्या घटनेनंतर आज (शनिवार) सकाळ पासूनच राज्याचे अनेक मंत्री भंडारा येथील घटनास्थळी भेट देत आहेत. घटनेच्या 12 तासानंतर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे देखील भंडारा येथे जाण्यासाठी नागपूरच्या विमानतळावर आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी या दुर्दैवी घटनेतील मृतकांचा नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देणार असल्याची घोषणा केली.

बोलताना आरोग्य मंत्री टोपे

रुग्णालयाच्या शिशू कक्षाला आग लागली तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी लहान बाळांचे प्राण वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने या दुर्घटनेत दहा नवजात बाळांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर सात बालकांना वाचवण्यात यश आलेले आहे. हृदयाला पिळवटणारी ही घटना असल्याचे ते म्हणाले आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याच्या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. भंडारा येथे गेल्यानंतर घटनेबाबत प्राथमिक आवाहन प्राप्त होईल. त्या आधारे दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

घटनेच्या चौकशीसाठी तीन पथके

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू कक्षाच्या अतिदक्षता विभागला आग लागल्यामुळे दहा नवजात बालकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आले आहेत. ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक तज्ज्ञ, इलेक्ट्रिकल तज्ज्ञ आणि स्ट्रक्चर तज्ज्ञांचा समावेश असणार आहे.

निष्काळजी करणाऱ्यांची गय नाही

प्राथमिक दृष्ट्या आग कशामुळे लागली हे सांगणे योग्य नाही. संपूर्ण चौकशीनंतर या घटनेसाठी दोषी ठरणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे, टोपे म्हणाले आहेत.

राज्यातील संपूर्ण रुग्णालयाचे ऑडिट करावे लागणार

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला आग लागल्याच्या घटनेनंतर राज्यातील संपूर्ण रुग्णालयांचे फायर, स्ट्रक्चर, इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक ऑडिट कारावे लागणार असल्याचे मत आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत. भविष्यात अश्या घटना घडू नये यासाठी ऑडिट करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले आहेत.

हेही वाचा - 'माझे बाळ मला परत पाहिजे'; बाळासाठी मातांचा टाहो

हेही वाचा - भंडारा दुर्घटनेची सरकारकडून गंभीर दखल - पालकमंत्री विश्वजीत कदम

Last Updated : Jan 9, 2021, 5:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.